dev-k.jpg 
पुणे

मुख्यमंत्र्यांची आज वरवंड येथे जाहीर सभा

सकाळ वृत्तसेवा

केडगाव (पुणे) : भारतीय जनता पक्षाची महाजनादेश यात्रा आज (ता. १४ ) दौंड तालुक्यातून जात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरवंड येथे जाहीर सभा घेणार आहेत. बाजारतळावर दुपारी दोन वाजता ही सभा होईल. अशी माहिती आमदार राहुल कुल यांनी वरवंड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. 

निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री फडणवीस दौंडमध्ये येत असून कुल यांचे कार्यकर्ते शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत आहेत. राज्याबरोबर मुख्यमंत्री दौंडबद्दल काय बोलणार याबाबत उत्सुकता आहे.

यात्रेबाबत माहिती देताना आमदार कुल व भाजपचे तानाजी दिवेकर म्हणाले, यात्रा काष्टी (ता. श्रीगोंदा ) येथून सुरू होणार आहे. काष्टी, दौंड, कुरकुंभ, भिगवण, बारामती, वरवंड, उरूळीकांचन, हडपसर असा यात्रेचा मार्ग राहिल. ही यात्रा शनिवारी पाच तालुक्यातून जाणार असली तरी जाहीर सभा फक्त दौंड तालुक्यात होणार आहे. इतर ठिकाणी मुख्यमंत्री बस थांबवून बसमधूनच उपस्थितांना संबोधीत करतील. यात्रेत कोणाचे प्रवेश किंवा भूमीपूजन ठेऊ नयेत असे संकेत आहे.

दरम्यान, नागरिकांनी सभेला उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. 'महाजनादेश यात्रा दौंडमधून घ्यावी असे मी फक्त सुचवले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौंडला न मागता सभा दिली हा त्यांचा मोठेपणा असून, दौंडकरांचा तो सन्मान आहे.' असे कुल यांनी स्पष्ट केले.     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT