Corona-Danger 
पुणे

Coronavirus : चिखली येथील घरकुलमध्ये कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्याने हा संपूर्ण परिसर केला सील

सकाळवृत्तसेवा

 पिंपरी - चिखली येथील घरकुलमध्ये कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह सापडल्याने हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना रेशनही मिळत नसल्याचे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यासाठी येथील नागरिकांनी किमान रेशन तरी मिळावे, अशी मागणी केली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिकेच्या वतीने ही घरकुल योजना राबविण्यात आली आहे. या योजनेत 140 सोसायट्या असून पाच हजार 500 कुटुंब राहतात. या भागात राहणाऱ्या 15 टक्के नागरिकांचे रेशनकार्ड सुरू आहेत. तसेच 85 टक्के जणांची रेशनकार्ड त्यांनी मूळ पत्त्यावरुन घरकुलमधील नवीन पत्त्यावर आल्याने बंद आहेत. आणखी काही दिवस हा परिसर बंद राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे येथील नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान फेडरेशन ऑफ घरकुलचे प्रवर्तक अशोक मगर यांनी सांगितले, 'मी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना पत्र पाठविले आहे. त्यामध्ये आमच्याकडे वितरण व्यवस्थेचे नियोजन आहे. सरकारने रेशनची देण्याची व्यवस्था करावी. त्याच्या वाटपाचे नियोजन करण्याची जबाबदारी आम्ही घेऊ.''

यासंदर्भात फेडरेशन ऑफ घरकुलचे अध्यक्ष नारायण धुरी यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्रही पाठविले आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे, 'या भागातील नागरिकांना किराणा माल देण्यासाठी ठोस उपाययोजना करावी. अनेक कुटुंबे रोजंदारीची कामे करतात. याबाबत लवकर उपाययोजना न केल्यास अडचणींमध्ये आणखी भर पडेल.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : सार्वजनिक ठिकाणांवरुन कुत्री हटवली जाणार, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा आदेश, श्वानप्रेमींची याचिका फेटाळली

Vinesh Phogat: विनेश फोगाटला दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा! कुस्ती फेडरेशनच्या 'त्या' निर्णयावर कोर्ट ठेवणार लक्ष

Share Market: भारतीय बाजाराला मोठा धक्का! जगातील टॉप 100 कंपन्यांमध्ये भारताची एकही कंपनी नाही

२५ वर्षांपासून एकच विषय शिकवला, मनीषा मांढरेला सर्व प्रश्न तोंडपाठ? नीट पेपरफुटी प्रकरणी CBI समोर पुरावा शोधण्याचं आव्हान

Latest Marathi News Live Update : वांद्र्यात अतिक्रमावर बुलडोजर, पश्चिम रेल्वेची कारवाई

SCROLL FOR NEXT