Tampering 
पुणे

चिखलीतील घरकुलवासी टवाळखोरीने हैराण

अनंत काकडे

चिखली - चिखलीतील घरकुलमध्ये प्रवेश केल्यावर काही इमारतींखाली पत्ते खेळणारे तरुण नजरेस पडतात.. रात्रीच्या वेळी उघड्यावर मद्यपान करणारेही सोळा ते पंचविशीतील तरुण पाहायला मिळतात, नव्हे तर महिला आणि मुलींची छेडछाड करणारे गुंडांचे टोळकेही येथे आहे. परिणामी, घरकुल परिसरातील महिलांसह सर्वसामान्य नागरिक दहशतीखाली वावरत आहेत.

या सर्व प्रकारांमुळे मुली विशेष भेदरलेल्या असून, हा परिसर सोडून अन्यत्र स्थलांतरित होण्याचा आग्रह त्यांनी पालकांकडे धरला आहे. ‘‘सांगा, आम्ही कसे राहायचे,’’ अशी विचारणा आता येथील नागरिक करू लागले आहेत.
स्वतःचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. घरकुलाच्या माध्यमातून अनेकांचे घराचे स्वप्न साकार झाले. पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक या परिसरात राहण्यास आले. मात्र, आता या भागात काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी शिरकाव केल्याने सर्वसामान्यांचे जीवन मुश्‍कील झाले आहे. आठ दिवसांपूर्वी एका गुंडाने भरदिवसा एका मुलीचे अपहरण करून तिचा विनयभंग केला. याबाबत निगडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

त्यानंतर तर मुली व महिलांच्या मनात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. एकट्या मुली बाहेर पडायला घाबरत आहेत. नव्याने बांधून तयार असलेल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये सायंकाळच्या वेळी नजर टाकल्यास तळीरामांचा अड्डा जमलेला दिसतो. प्रत्येक इमारतीसाठी स्वतंत्र सुरक्षारक्षक आहेत; परंतु या तळीरामांची दहशत आहे. सायंकाळी कामावरून आलेल्या महिला आणि तरुणी या नशेबाज तरुणांमधून वाट काढण्यास कचरतात. घरात जाण्याचे धाडस करू शकत नाहीत. घरी एकट्याच असलेल्या तरुण मुलामुलींबाबत नोकरदार पालकांना चिंता सतावते. अनेक टवाळखोर मित्रांना जमवून तरुणी व महिलांची छेड काढतात. अनेक भाईंचेही येथे वर्चस्व आहे. त्यांना हटकण्याचा प्रयत्न केल्यास ते परिसरात दहशत निर्माण करतात. त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार देण्याचे सोडाच, त्यांच्याविषयी बोलण्याचे धाडसही सर्वसामान्यांना नाही. 

घरकुलमध्ये राहणारे सर्व रहिवासी कामधंदा करून पोट भरणारे आहेत. मात्र, काही चारदोन गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींमुळे या परिसरातील वातावरण बिघडले आहे. त्यामुळे या गुंडागर्दी करणाऱ्या तरुणांना वेळीच आवर घालावा, अशी घरकुल समस्या निवारण समितीचे अध्यक्ष तुषार सोनवणे, उपाध्यक्ष अझहर शिकलगार आणि कार्याध्यक्ष रतनकुमार गायकवाड यांनी मागणी केली आहे.

 तरुणींना एकटे घराबाहेर पडणे मुश्‍कील
 इमारतींखाली दररोज सायंकाळी तळीरामांचा अड्डा
 सुरक्षारक्षक असूनही टवाळखोरांची दहशत
 बाहेरील टवाळखोरांचा येथे मुक्त वावर
 भाईंचेही वर्चस्व

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas Kadam : 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला' ही माहिती रामदास कदमांना कुणी दिली? स्वत: सांगितलं नाव...

Maharashtra tourism : महाराष्ट्राचे दार्जिलिंग! फोफसंडी गावाची या खासियत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

Pune Crime: पुण्यातील दौंडमध्ये थरारक घटना! पत्नीचा गळा दाबून खून, नंतर उचललं टोकाचं पाऊल

Latest Marathi News Live Update : फर्ग्युसन रस्त्यावरील वाहतूक आज काही वेळासाठी बंद करण्यात येणार

Panchang 3 October 2025: आजच्या दिवशी अर्गला स्तोत्र पठण व ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT