पुणे

ग्रामपंचायतीचा कर वसुलीचा वेग मंद

CD

आळंदी, ता. २० : चऱ्होली खुर्द ग्रामपंचायतीची २०२५-२६ या आर्थिक वर्षात मिळकतकर वसुली तीन कोटी ५४ लाख ३८३० रुपये म्हणजेच अवघी ४० टक्के आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात मागील थकबाकीसह शंभर टक्के कर वसुलीसाठी ग्रामपंचायत कंबर कसली असून, कर्मचाऱ्यांची तीन गटात विभागणी करून घरोघरी भेट देऊन मिळकत कर वसुली करीत आहेत. प्रतिसाद न देणाऱ्या मिळकतधारकांना एक मार्चपासून कर वसुली बाबतच्या नोटीस काढणार असल्याची माहिती ग्रामविस्तार अधिकारी बाळासाहेब बिंदले यांनी दिली.
आळंदी शहरालगत असलेले ग्रामपंचायत चऱ्होली खुर्द गावचा भौगोलिक विस्तार मोठा असून, या ठिकाणी खासगी विकसकांनी अनेक अपार्टमेंट उभ्या केल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायत नागरीकरण वाढले आहे. परिणामी ग्रामपंचायतीचे आर्थिक उत्पन्नही वाढले आहे. मात्र करांची वसुली ४० टक्केच असल्याने शंभर टक्के वसुलीकडे ग्रामपंचायतीचा भर असल्याचे दिसून येते.
सध्या कर्मचाऱ्यांची तीन गटात विभागणी केली असून, घरोघरी जाऊन बिल वाटप तसेच मिळकत कर वसुली केली जात आहे. तसेच ग्रामपंचायत हद्दीत ध्वनिक्षेपकाद्वारे कर वसुलीचे आवाहन नागरिकांना केले जात आहे. फेब्रुवारी महिना अखेर कर वसुली बाबत प्रचार, प्रसिद्धी झाल्यानंतर प्रतिसाद न देणाऱ्या मिळकतधारकांना कर वसुली बाबतच्या नोटीस पाठवल्या जाणार आहेत, असे बिंदले यांनी सांगितले.
मागील थकबाकी आणि चालू वर्षातील कर वसुलीचे उद्दिष्ट मिळून एकत्र मिळकत कर वसूल केला जाणार आहे. यामुळे आता थकबाकीदारांना ग्रामपंचायतीकडून होणारी कारवाई टाळण्यासाठी आणि नळ पाणीपुरवठा आणि आरोग्य सोयी मिळवण्यासाठी चालू करासह थकबाकी कर भरावा लागणार असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत हद्दीत करपात्र मिळकतींची संख्या ८ हजार ०८४, तर ग्रामपंचायत हद्दीतील एकूण मिळकती ८ हजार ०८४ आहेत. पाणीपट्टीचे एकूण नळ कनेक्शन ३४५ आहेत. सध्या ग्रामपंचायतीला पाणीपट्टीचे मिळणारे एकूण उत्पन्न १ लाख ५० हजार ४७५ एवढे आहे.

थकबाकी अधिक
ग्रामपंचायतीची २०२५-२६ ची एकूण कर मागणी ८ कोटी ७८ लाख ९२ हजार ७१२ रुपये आणि वसुली आजपर्यंत आकडेवारीत ३ कोटी ५४ लाख ०३ हजार ८३० रुपये तर टक्केवारी अवघे ४० टक्के आहे. चालू आर्थिक वर्षात कर वसुलीचे उद्दिष्ट २ कोटी ९२ लाख २४ हजार ४८० रुपये आहे. मागील थकबाकीची एकूण रक्कम ५ कोटी ८६ लाख ६८ हजार २३२ एवढी असून, मागील आर्थिक वर्षात वसूल झालेली कराची रक्कम २ कोटी ४३ लाख ७० हजार ८८५ एवढी जमा झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT