पुणे

स्पाइन रोडवरील कोंडी सोडविण्याची मागणी

CD

पिंपरी, ता. ४ ः चिखली कुदळवाडी चौक ते कृष्णानगर संविधान चौक या स्पाइन रस्त्यावरील सर्व्हिस रोडवर वाढलेले अनधिकृत पार्किंग, वाहतूक कोंडी, पदपथावरील संशयित अनधिकृत बांधकाम व झाडतोडीच्या तक्रारींमुळे परिसरातील नागरिकांना दररोज त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
डॉल्फिन विस्टा सोसायटीलगत असलेले स्टार बाजार, मॅट्रिक्स क्लासेस, मौर्य फोर हॉटेल, सूर्या हॉस्पिटल परिसर तसेच कृष्णानगर पोलिस लाइनसमोरील बस पार्किंगमुळे सर्व्हिस रोडवर वाहतुकीचा ताण निर्माण होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. कुदळवाडी पुलाच्या मुख्य चौकापासून घरकुल मुख्य चौकापर्यंतचे अवघे सुमारे ३०० मीटर अंतर पार करण्यासाठी नागरिकांना अनेकदा अर्धा ते पाऊण तास वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ, इंधन आणि मानसिक त्रास वाढत असून दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. त्यामुळे प्रशासनाने आवश्‍यक उपाययोजना करून वाहतूक कोंडी सोडविण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

प्रमुख मागण्या
- सर्व्हिस रोडवरील अनधिकृत पार्किंग त्वरित हटवावे
- वाहतूक सुरळीत करण्यासाठी कायमस्वरूपी नियोजन करावे
- पदपथावरील संशयित अनधिकृत बांधकामाची तपासणी करावी
- अनधिकृत अतिक्रमण आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी
- आवश्यक ठिकाणी ‘नो पार्किंग’ फलक लावून कठोर अंमलबजावणी करावी
- रुग्णवाहिका व अग्निशमन दलासाठी आपत्कालीन मार्ग कायम खुला ठेवावा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Senagaon Farmer Death : हृदयद्रावक घटना ! वीजपुरवठा अचानक सुरू झाला अन् रोहित्रावरच शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू; मृतदेह ५ तास लटकत राहिला

Will Planning: इच्छापत्र : प्रेमाची परंपरा ठेवून जाण्याचा मार्ग

Marathi News Live Updates : पाकिस्तानमध्ये लष्करी ताफ्यावर हल्ल्यात ४ सैनिक ठार

Asian Games: ९ षटकार अन् शतक... Shafali Verma ने विश्वविक्रमासह मोडले ६ मोठे विक्रम; स्मृती मानधनालाही टाकलंय मागे

Input Tax Credit: ‘आयटीसी’ घेण्याची सुविधा स्मार्ट सल्ला

SCROLL FOR NEXT