पुणे

चिखलठाण जिल्हा परिषद गट व चिखलठाण व उमरड पंचायत समिती गण वार्तापत्र

CD

लोगो : चिखलठाण जि.प. गट
---
CKL26B02874
प्रमोद बदे
---
CKL26B02873
प्रशांत पाटील
---
CKL26B02872
रामदास झोळ
---
गटात दिग्गज उतरल्याने निवडणूक अटीतटीची
बागल-शिंदे युतीमुळे पाटील गटासमोर आव्हान; बहुरंगी लढत
गजेंद्र पोळ : सकाळ वृत्तसेवा
चिखलठाण, ता. २३ : करमाळा तालुक्यातील एकमेव सर्वसाधारण प्रवर्गाचा चिखलठाण जिल्हा परिषद गट हा सुरवातीपासूनच चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वीच अनेक दिग्गजांची नावे चर्चेत आल्याने तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष या गटातील निवडणुकीकडे लागले होते. आमदार नारायण पाटील यांना काहीसा अनुकूल मानल्या जाणाऱ्या या गटात बागल- शिंदे युतीमुळे तगडे आव्हान उभे राहिले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक जाहीर होताच माजी आमदार जयवंतराव जगताप यांचे चिरंजीव शंभुराजे जगताप, बागल गटाचे नेते दिग्विजय बागल तसेच आमदार नारायण पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील यांची नावे चर्चेत होती. भाजप- राष्ट्रवादी युतीत ही जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली असून, जिल्हा परिषदेसाठी माजी आमदार संजयमामा शिंदे समर्थक प्रशांत पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. त्यांच्या विरोधात तालुका विकास आघाडीकडून नुकतेच आमदार नारायण पाटील गटात प्रवेश केलेले माजी जिल्हा परिषद सदस्य वामनराव बदे यांचे चिरंजीव प्रमोद बदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, भाजपकडून दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामदास झोळ यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ही लढत अधिकच चुरशीची झाली आहे. शिवसेनेकडून अजिंक्य सरडे रिंगणात उतरल्याने बहुरंगी सामना पाहायला मिळणार आहे.
चिखलठाण पंचायत समिती गणासाठी बागल- शिंदे युतीकडून माजी जि.प. सदस्य चंद्रकांत सरडे यांच्या पत्नी वनमाला सरडे यांनी अर्ज दाखल केला आहे. तर आमदार पाटील गटाकडून आदिनाथ कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केरू गव्हाणे यांनी गटात प्रवेश करून त्यांच्या भावजय लता गव्हाणे व तनया गलांडे यांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
उमरड पं.स. गण हा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलेसाठी आरक्षित असून, याच गणातून सभापतिपद मिळण्याची संधी असल्याने या जागेकडे विशेष लक्ष आहे. तालुका विकास आघाडीकडून माजी सभापती अतुल पाटील यांच्या पत्नी अदिती पाटील व उमरडच्या माजी सरपंच सुनीता मारकड यांनी अर्ज दाखल केले असून, अदिती पाटील यांची उमेदवारी कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बागल- शिंदे युतीकडून वरकटणे येथील विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शरद देवकर यांच्या पत्नी सोनाली देवकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सर्वच गटांकडून तगडे उमेदवार मैदानात उतरल्याने चिखलठाण जि.प. व पं.स. गटात यंदा मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.
---
चौकट
ठळक बाबी...
- निवडणुकीच्या तोंडावर वामनराव बदे, तात्यासाहेब मस्कर व केरू गव्हाणे यांसारख्या नेत्यांनी पाटील गटात प्रवेश केल्याने या निवडणुकीसाठी वेगळी रणनीती आखण्यात आली आहे.
- ऐनवेळी प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना संधी दिल्यामुळे पाटील गटातील नाराजांची समजूत काढण्याचे आव्हान नेतृत्वासमोर आहे.
- बागल-शिंदे युती झाली तरी जि.प. व पं.स.च्या तिन्ही जागा संजय शिंदे गटाकडे गेल्याने बागल गटातील कार्यकर्त्यांना सक्रिय ठेवणे हेही मोठे आव्हान ठरणार आहे.
---
चिखलठाण गटातील गावे
चिखलठाण गण : वाशिंबे, मांजरगाव, उंदरगाव, रिटेवाडी, चिखलठाण, कुगाव, केडगाव, सोगाव.
उमरड गण : झरे, कुंभेज वरकटणे, सरपडोह, कोंढेज, उमरड, पोफळज, अंजनडोह.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT