child abuse crime in alandi posco act on warkari maharaj pune Sakal
पुणे

Alandi Crime News : आळंदीत भोंदू महाराजांवर पोस्को; तीन अल्पवयीन वारकरी विद्यार्थ्यांवर अत्याचार

वारकरी संप्रदायिक शिक्षण घेण्यासाठी आळंदीत आलेल्या तीन अल्पवयीन वारकरी विद्यार्थ्यांवर संस्थाचालक गुरुनेच अनैसर्गिक बलात्कार केल्याची घटना आज उघड झाली.

विलास काटे

Alandi Crime News : तीन अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक बलात्कार वारकरी संप्रदायातील प्रतिष्ठित महाराजाने केल्याची घटना आज आळंदीत उघड झाली. याप्रकरणी आळंदी पोलीस स्टेशनला कलम भादंवी ३७७ व पोस्को कायदा कलम ४ ५ ( f ) ६ ८ १० अन्वये गुन्हा दाखल झालेला आहे.

दासोपंत उर्फ स्वामी हरिभाऊ उंडाळकर उर्फ आळंदीकर (वय:५२,रा. घुंडरे गल्ली, आळंदी देवाची,ता.खेड,जि पुणे) असे भोंदू महाराज आरोपीचे नाव असुन आळंदी पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. संबंधित आरोपीला दिघी येथिल लाॅकअप मधे ठेवले आहे.

आळंदी पोलिसांनी सांगितलेल्या माहीतीनुसार, याप्रकरणी फिर्याद पिडित बालकांच्या नातेवाईकांनी दिली आहे.

आरोपी दासोपंत उंडाळकर हा मुळचा मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यातील असून गेली तीस वर्षापेक्षा अधिक काळ आळंदीत राहत आहे. पिडित तीनही विद्यार्थी मुळचे परभणी जिल्ह्यातीलच आहेत. आरोपी दासोपंत उंडाळकर याने पिडित विद्यार्थ्यांवर मागील तीन महिन्याच्या कालावधीमध्ये वेळोवेळी अनैसर्गिक कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगीतले.

दरम्यान आज आळंदी पोलिसांत तक्रार देणेसाठी आले. आरोपी प्रतिष्ठित महाराज असल्याने विविध स्तरावरून राजकीय दबावही पिडितांच्या पालक आणि पोलिसांवर असल्याची चर्चा पोलिस ठाण्याच्या आवारात होती.

दरम्यान गुन्ह्याची प्राथमीक माहिती कळाल्यावर पिंपरी पोलिस आयुक्त कार्यालयाचे पोलिस उपआयुक्त शिवाजी पवार, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह गौर, यांनी भेट दिली. स्थानिक पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनिल गोडसे यांनी गुन्हा दाखल करून आरोपी उंडाळकरला अटक केली. गुन्ह्याचा पुढिल तपास सहायक पोलिस निरिक्षक अनिल लोहार करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs CSK Live: चेन्नई सुपर किंग्सची विजयी मालिका खंडित! सनरायझर्स हैदराबादचा शानदार विजय; IPL 2026 Points Table बदललं

IPL 2026: आश्चर्यच... ना विराट, ना शुभमन Orange Cap तिसऱ्याच कुणाकडे; Purple Capवर चेन्नईच्या गोलंदाजाने निर्विवाद वर्चस्व

'काँग्रेस, काँग्रेस आणि फक्त काँग्रेस...;' मोदींचा केंद्रबिंदू त्याच नावाभोवती फिरला, संपूर्ण भाषणात किती वेळा उल्लेख केला?

SRH vs CSK Live: ४,४,४,४,४,६! आयुष म्हात्रेचं वादळ हेनरिच क्लासनने रोखलं; अविश्वसनीय झेल घेत हैदराबादचं मैदान गाजवलं Video Viral

होर्मुझ संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक! समुद्री व्यापारासाठी ‘सुरक्षाकवच देणार; जहाजांसाठी मोठी खुशखबर

SCROLL FOR NEXT