पुणे

वाई:-अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीस २० वर्षे सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा. वाई जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय

CD

वाईत अत्‍याचारप्रकरणी
एकास २० वर्षे कारावास

न्‍यायालयाकडून १५ हजारांचा दंड

वाई, ता. २४ : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पाचगणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका गावातील २९ वर्षीय युवकाला बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) अंतर्गत व आयटी कायद्यांतर्गत वाई येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी २० वर्ष सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दरम्यान, न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे गुन्हेगारी विश्वात खळबळ उडाली आहे. वसीम अकबर हुसेन रजा (वय २९) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, पाचगणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात पीडित १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी कुटुंबीयांसमवेत राहण्याकरिता आहे. दरम्यान, आरोपी वसीम रजा याने ती एकटी असताना घरात घुसून जबरदस्तीने शरीरसंबंध करीत जीवे मारण्याची, तसेच मोबाईलवर व्हिडिओ, फोटो काढून प्रसारित करण्याची धमकी दिल्‍याची फिर्याद मुलीच्या आईने पाचगणी पोलिस ठाण्यात १० सप्टेंबर २०२३ रोजी दिली होती. त्‍यानुसार दाखल गुन्ह्याचा तपास महाबळेश्वर पोलिस ठाण्‍याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक संदीप भागवत यांनी करून, वाई जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केले होते. या खटल्यात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील दयाराम पाटील, महेश शिंदे आणि फिर्यादीचे विशेष वकील ॲड. दिनेश धुमाळ व ॲड. भारती कोरवाल यांनी कामकाज पाहिले. यावेळी दहा साक्षीदार तपासण्यात आले. त्यांनी केलेला युक्तिवाद, साक्षीदारांचे जबाब व सादर केलेले परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य मानत वाई येथील अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी आरोपी वसीम रजा यास बलात्कारप्रकरणी व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम (पोक्सो)अन्वये व आयटी ॲक्‍ट अंतर्गत दोषी ठरवून वीस वर्ष सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
याकामी सरकारी वकील दयाराम पाटील, महेश शिंदे यांना पोलिस अधीक्षक तुषार दोशी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, वाईचे पोलिस उपअधीक्षक सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर पोलिस ठाण्‍याचे तपासी अधिकारी तथा तत्कालीन पोलिस निरीक्षक संदीप भागवत, पाचगणी पोलिस ठाण्‍याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, न्यायालयीन प्रॉसिक्युशन स्‍कॉडचे पोलिस अंमलदार भुजंगराव काळे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक शिवाजीराव पांब्रे, सहाय्यक फौजदार अविनाश डेरे, पोलिस अंमलदार कीर्तिकुमार कदम, सुधाकर सपकाळ, हेमा कदम, प्रीतम नाळे, सोमनाथ कुंभार यांनी सहकार्य केले.

----------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash: 'व्हीएसआर'च्या विमान उड्डाणांवर बंदी; बारामती विमान अपघात प्रकरणी DGCAची मोठी कारवाई

Pune Crime : बारावीचा पेपर संपताच कोथरूडमध्ये विद्यार्थ्यावर कोयत्याने वार; दोन अल्पवयीन ताब्यात

Fruit Drink Maaza: 'माझा'च्या छोटा पॅकमध्ये आढळली घाण; ११ वर्षीय मुलाची प्रकृती बिघडली

Kukadi Project : कुकडी प्रकल्पातून उन्हाळी पहिल्या आवर्तनात 7.6 टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय

Katraj Accident : कात्रज बोगद्याजवळ दरीपुलावर अपघातात ट्रक चालक ठार, सातजण जखमी

SCROLL FOR NEXT