बालस्नेही पोलीस कक्षातील सुविधांविषयी माहिती घेताना (डाविकड़ून पहिले) अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते व महिती देताना (उजवीकडील) गार्गी काळे.
बालस्नेही पोलीस कक्षातील सुविधांविषयी माहिती घेताना (डाविकड़ून पहिले) अपर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते व महिती देताना (उजवीकडील) गार्गी काळे. Sakal
पुणे

बालमनाला जपण्यासाठी बालस्नेही पोलीस कक्ष उपयुक्त

सकाळ वृत्तसेवा

यवत - पोलीस स्टेशनला विविध कारणासांठी आलेल्या नागरीकांसोबत अनेकदा त्यांची बालकेही असतात. या लहानग्यांच्या मानावर पोलीस स्टेशनच्या वातावरणाचा विपरीत परिणाम होऊ नये, त्यांच्या मनाला धक्का लागू नये, मुले भयभित होऊ नयेत, ती सतत आनंदी राहावीत यासाठी बालस्नेही कक्ष उपयुक्त ठरणार आहे, असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते यांनी केले.

नोबेल पारितोषीक विजेते कैलाश सत्यार्थी फाऊंडेशन (नवी दिल्ली) व ज्ञानशक्ती विकास वाहिनी मंचर (ता. आंबेगाव) यांच्या पुढाकाराने यवत येथे बालस्नेही कक्ष व हिरकणी कक्षाची उभारणी करण्यात आली त्याचे उद्धाटन मोहिते यांच्या हास्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

जनशक्ती विकास वाहिनीच्या गार्गी काळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तावीक केले. या वेळी त्यांनी बालस्नेही कक्षाची गरज व महत्वा स्पष्ट केले. सर्वेच्च न्यायालयाने पारीत केलेल्या आदेशानुसार बालसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी कराली लागते. यासाठी या दोन्ही संस्थांनी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यात असे 23 बालस्नेही पोलीस कक्ष उभारणार आहोत. नारायणगाव नंतर असा कक्ष उभारलेले यवत हे दुरसे पोलीस स्टेशन असल्याचेही त्यांनी सांगीतले.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक नारायण पवार, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांनी मनोगत व्यक्त केले. 'जनशक्ती'चे अध्यक्ष डी. के. वळसे पाटील, विस्तार अधिकारी बाबा मुलाणी, प्राचार्य दादा मासाळ, 'सत्यार्थी'च्या दिक्षा यादव, यावतचे सरपंच समीर दोरगे, उपसरपंच सुभाष यादव, माजी पंचाय समीती सदस्य कुंडलीक खुटवड, सदानंद दोरगे प्रामुख्याने उपस्थीत होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांनी सुत्रसंचलन केले, केशव वाबळे यांनी आभार मानले.

बालस्नेही पोलीस कक्षात लहान मुलांसाठी विविध प्रकारची खेळणी, चित्रमय भिंती, अंकलीपी व उजळणीचे तक्ते, रंगसाहित्य, खेळण्यातील घर अशा वस्तू उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर शुद्ध पाणी, सौरदिवे, सीसीटीव्ही कॅमेरे अशा सुविधाही देण्यात आल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Josh Baker: क्रिकेटविश्वात शोककळा! इंग्लंडच्या 20 वर्षीय खेळाडूचे निधन, काउंटी संघाने दिली माहिती

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT