nval-kishor-raam.jpg
nval-kishor-raam.jpg 
पुणे

बालकामगारांच्या पुनर्वसनासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा : जिल्हाधिकारी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : ''बालकामगारांना त्यांचे हरविलेले बालपण परत मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी स्वयंसेवी संस्थांसह सर्वांनी पुढाकार घ्यावा'', असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले. 

बाल कामगार प्रथेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी समाजाच्या सर्व घटकांपर्यंत या प्रथेविषयी जनजागृती करण्यासाठी 7 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर 2019 या कालावधीत जिल्ह्यात जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. अतिरिक्‍त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, कामगार उपायुक्त विकास पनवेलकर, सहायक कामगार आयुक्त चेतन जगताप, अजित खरात, कामगार अधिकारी डी. डी. पवार, एस. एच. चोभे या वेळी उपस्थित होते. 

राम म्हणाले, बालकामगार मुक्तीच्या अभियानास समाजातील प्रत्येक घटकाने मदत केल्यास बालकामगार प्रथा समूळ नष्ट होण्यास वेळ लागणार नाही. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी या मुलांना शिक्षण देऊन मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे. घरकाम, विटभट्टीवर, बांधकाम, हॉटेल, कचरा वेचणे अशा अनेक उद्योगात ही मुले काम करतात. अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे. बालकामगारांचे पुनर्वसन करण्यासाठी सरकारमार्फत अनेक उपक्रम राबविले जात आहेत. बालकामगारांच्या या मोहिमेत स्वयंसेवी संस्थांचा सहभाग महत्त्वाचा ठरणार आहे. 

बालकामगारांना कामावर न ठेवण्याबाबत हमीपत्र 
या अभियानात संस्थाचालक आणि मालक यांना बालकामगार अधिनियमाची माहिती देण्यात येईल. चर्चासत्रे आयोजित करून आस्थापना मालक, चालक यांच्याकडून बाल कामगारांना कामावर न ठेवण्याबाबत हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे. स्वयंसेवी संस्था, अंगणवाडी सेविका, आशा सेविका यांच्या सहकार्याने अत्यल्प उत्पन्न असणाऱ्या पालकांचे प्रबोधन करणे, बालकामगार प्रथेविरूध्द जनजागृती आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती कामगार उपायुक्त पनवेलकर यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT