पुणे

राजगुरुनगरमध्ये बालविवाह प्रतिबंध जनजागृती कार्यशाळा

CD

राजगुरूनगर, ता. ७ : बालविवाह या गंभीर सामाजिक समस्येच्या प्रतिबंधासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने योजक संस्था, चैतन्य संस्था आणि फोर्ब्स मार्शल कंपनीच्या वतीने येथील खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात बालविवाह प्रतिबंध जनजागृती कार्यशाळा नुकतीच पार पडली.
कार्यक्रमास फोर्ब्स मार्शल कंपनीच्या अधिकारी बिना जोशी, स्वप्नील हुंबरे, ऋतुजा चाफेकर, योजक संस्थेच्या रेणू इनामदार, चैतन्य संस्थेच्या विश्‍वस्त डॉ. सुधा कोठारी यांची उपस्थिती लाभली. कार्यशाळेदरम्यान चाइल्ड वेल्फेअर कमिटीच्या नंदिता अंबिके यांनी मार्गदर्शन केले. त्यांनी बालविवाहाची प्रमुख कारणे, त्याचे आरोग्यावरील दुष्परिणाम, शिक्षणावर होणारा परिणाम तसेच सामाजिक परिणाम याविषयी माहिती दिली. बालविवाह प्रतिबंधासाठी अस्तित्वात असलेल्या कायदेशीर तरतुदी, संबंधित कायद्याची अंमलबजावणी, तक्रार नोंदणीची प्रक्रिया याबाबतही मार्गदर्शन केले. कार्यशाळेत २०० हून अधिक जणांचा सहभाग होता. सूत्रसंचालन मनीषा कड, दिशा ढगे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Political News : सचिन अहिर यांच्यानंतर ठाकरेंचा आणखी एक विश्वासू शिलेदार शिंदे गटात? सरनाईकांसोबत फोटोमुळे चर्चेला उधाण

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

ज्यांच्या नृत्याने महाराष्ट्र डोलला, त्यांच्याच पदरी लग्नानंतर आला इतका त्रास, विठाबाई नारायणगावकर यांची न ऐकलेली कहाणी

July 2026 Calendar: आषाढी एकादशी, जगन्नाथ यात्रा ते गुरु पौर्णिमा; जाणून घ्या जुलै महिन्यातल्या सण-उत्सवांची यादी

Latest Marathi News Live Update : धुळे शहरासह परिसरामध्ये तब्बल सहा ते सात दिवसांच्या दीर्घ विश्रांतीनंतर आज पावसाने लावली हजेरी

SCROLL FOR NEXT