The children along with the teachers in Purandar interacted directly with the Chief Minister 
पुणे

पुरंदरमधील कुंभारवळणच्या विद्यार्थ्यांनी शिक्षिकेसह मुख्यमंत्र्यांशी साधला थेट संवाद

सकाळवृत्तसेवा

खळद : महाराष्ट्र शासनाच्या महानेट फेज २ या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका शीतल खैरे-जाधव व त्यांचे विद्यार्थी यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. या कार्यक्रमाला संपूर्ण पुणे जिल्ह्यातून कुंभारवळण या एकमेव गावाची निवड करण्यात आली होती.
          

या कार्यक्रमासाठी गटविकासाधिकारी अमर माने,गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, केंद्रप्रमुख राजेंद्र जगताप, मंडल अधिकारी प्रभावती कोरे, आरोग्य विभाग प्रमुख बेलसर, जि.प.प्राथ.शाळा कुंभारवळणचे सर्व शिक्षक,पालक उपस्थित होते.
        

यावेळी आढावा अहवालाच्या निमित्ताने गावाला मिळालेल्या मोफत इंटरनेट सुविधेच्या माध्यमातून  शितल खैरे-जाधव  यांनी मुख्यमंत्री साहेबांसमोर ऑनलाईन पाठाचे उत्कृष्ट सादरीकरण केले तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली. महानेटच्या माध्यमाने कोरोना संकटात ऑनलाईन शिक्षणामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणातील अडसर दूर होऊन विद्यार्थ्यांचा दर्जा नक्कीच उंचावणार असल्याचा विश्वास त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आणि महाराष्ट्र शासन माहिती तंत्रज्ञान विभागाचे आभार मानले.
           

यावेळी मुख्यमंत्री साहेबांनी ऑनलाईन शिक्षणाबाबत काही सूचना असतील तर त्या आम्हाला शिक्षकांनी नक्की कळवा असे आवाहन केले. मुख्यमंत्री यांच्याशी सुसंवाद साधण्यासाठी खैरे यांना शिक्षण विभागाचे मोलाचे सहकार्य लाभले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Priyank Kharge statement : प्रियांक खर्गेंंचं हिंदू धर्माबाबत मोठं विधान! ; निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला पडणार महागात?

Puja Khedkar: पूजा खेडकरच्या आई मनोरमा यांच्याविरुद्ध गुन्हा; सोमवारी पुन्हा बंगल्याची झडती, नेमकं काय घडलं?

NMIA: लोटस-इंस्पायर्ड डिझाईन, फ्युचरिस्टिक टेक अन्...; नवी मुंबई विमानतळ जागतिक पातळीवर चमकणार, कसं आहे नवं Airport?

ऊसतोड महिलांचं जगणं मांडणाऱ्या 'कूस' लघुपटाला राज्यस्तरीय तिसरे पारितोषिक

Latest Marathi News Updates : येवल्यात तासाभरापासून मुसळधार पाऊस

SCROLL FOR NEXT