स्केटींग sakal
पुणे

बारामतीकर चौदा बाळगोपाळांनी केले पुणे ते बारामती स्केटींग

बारामती रोलिन स्केटिंग क्लबच्या वतीने आज हा उपक्रम राबविला गेला.

मिलिंद संगई, बारामती

बारामती: येथील बाळगोपाळांनी आज पुण्यातील फुरसुंगी ते बारामती हे अंतर रिले स्केटिंग करत पूर्ण करुन नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. येथील बारामती रोलिन स्केटिंग क्लबच्या वतीने आज हा उपक्रम राबविला गेला. स्केटिंग या क्षेत्रात आज एक नवीन मानदंड या निमित्ताने स्थापन झाला. स्केटींग प्रशिक्षक तनिष्क शहा यांनी पुढाकार घेऊन या उपक्रमाचे आयोजन केले होते.

पुण्यातील फुरसुंगी येथे आज (ता. 12) सकाळी या उपक्रमाचा प्रारंभ झाला. एका पाठोपाठ एका मुलांनी स्केटींग सुरु करुन य़ा उपक्रमात सहभाग दिला. या मध्ये निशांतराजे डोरगे, सुजय गवळी, रामप्रसाद खन्ना, हर्ष खुराणा, रेहाना शेख, श्रीतेज गाढवे, श्रेया गोरे, वरद शिंदे, नेत्रा गाडेकर, पूर्वा गाडेकर, अन्वेश वायफळकर, श्लोक दोशी, सत्यव्रत सातव, शहाबाज तांबोळी या चौदा जणांनी फुरसुंगी ते बारामती हे अंतर स्केटींग करुन पूर्ण केले.

बारामती मधून आजपर्यंत सायकलिंग , जॉगिंग करत वेगवेगळे विक्रम बऱ्याच जणांनी केले आहे. पुणे बारामती स्केटिंग करत या मुलांनी बारामती मध्ये एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे व बारामतीचे नाव एका वेगळ्या क्षेत्रात उंचावले गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Crime : इचलकरंजीच्या तरूणाचे अपहरण करून निर्घृण खून; कर्नाटक -महाराष्ट्र सीमेवरील ओढ्यात फेकला मृतदेह, खुनाचं कारण काय?

Latest Marathi News Live Update : मुंबई–गोवा महामार्गातील विलंबावर सरकार व ठेकेदाराविरोधात अंत्ययात्रा काढून निषेध

जगभरात धुमाकूळ घालणारी रशियन दारू का आहे फेव्हरेट? किंमत ऐकून बसेल धक्का...

Kolhapur TET Oppose : टीईटी सक्तीविरोधात शिक्षकांचा प्रचंड आक्रोश; शाळा बंद ठेवत हजारोंचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम निमिष कुलकर्णी अडकला लग्नबंधनात; थाटात पार पडला विवाहसोहळा

SCROLL FOR NEXT