Balmela 
पुणे

बाल दिनानिमित्त फन गेम्स आणि धम्माल !

सकाळ वृत्तसेवा

पुणे - वर्गाबाहेरील शिक्षणाने मुलांची सामाजिक वाढ खूप चांगली होते. हेच शिक्षण मुलांना अधिक आनंद, उत्साह व समाजात जगण्याचे बळ देऊन जाते म्हणूनच मनोरंजनातून शिक्षण या संकल्पनेवर आधारित बाल दिनाचे औचित्य साधून ‘सकाळ यंग बझ’ व ‘सीएम इंटरनॅशनल स्कूल’तर्फे बालमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता. १६) संध्याकाळी ५ ते ९ या वेळेत हा बालमेळा होणार आहे. 

लहान मुलांचे जग हे नवनवीन कल्पनांनी भरलेले असते. आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीबद्दल मुलांच्या मनात उत्सुकता असते. मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारे अनेक खेळ या मेळ्यामध्ये असतील. घोडेस्वारी, मातीची भांडी तयार करणे, टॅटू मेकिंग, बंजी रन, बंजी जंपिंग, बास्केट बॉल, बलून टॉय मेकर, रिंगटॉस, बॉल पूल, वॉल-क्‍लाइंबिंग, बझर गेम असे खेळ गेमझोनमध्ये असतील. मुलांच्या आवडीचे किडी आर्ट, नेल आर्ट व जादूगार, अँग्री बर्ड आदी अनेक निरनिराळे प्रकार पाहायला मिळणार आहेत. सोबत मुलांच्या आवडीच्या असंख्य प्रकारच्या पदार्थांची मेजवानी असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतात सोन्याचं दर कमी होणार? RBI ने देशात परत आणलं १०४ टन सोनं

Fuel Price Hike India : पेट्रोल-डिझेल प्रति लिटर 4 ते 5 रुपये, तर एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महागणार? पुढील 5 ते 7 दिवसांत सरकार घेणार निर्णय!

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

RR vs DC Live: फुलटॉसवर यशस्वी गेला अन् भन्नाट यॉर्करने वैभव सूर्यवंशीचा त्रिफळा उडवला; Kyle Jamieson चे सेलिब्रेशन पाहा Video

Pune Satara Highway Traffic: सलग सुट्ट्यांचा फटका: पुणे-सातारा महामार्गावर नसरापूर-कापुरहोळदरम्यान सहा किमीपर्यंत भीषण वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT