करारांच्या पालनाचा
चीनकडून कांगावा
अरुणाचल प्रदेशातील घुसखोरीवर सारवासारव
बीजिंग, ता. २६ (वृत्तसंस्था) : अरुणाचल प्रदेशात चीनच्या सैन्याकडून सातत्याने घुसखोरी होत असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर, ‘‘चीनने सर्व करारांचे पालन केले आहे,’’ असा कांगावा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जाकुन यांनी केला आहे.
अरुणाचल प्रदेशामध्ये चीनच्या सैन्याकडून वारंवार घुसखोरी होते आणि सीमारेषेवर भारतीय सैन्याबरोबर अनेक वेळा ते आमनेसामने येतात, असे समोर आले होते. गस्तीच्या प्रस्थापित पद्धतींपासून चीनच्या सैन्याने फारक घेतल्यास भारत-चीन यांच्यातील परिस्थिती बिघडते, अशी प्रतिक्रिया भारताकडून देण्यात आली होती. ‘‘प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी तसेच गैरसमज आणि चुकीचे आकलन टाळण्यासाठी दोन्ही देश विद्यमान राजनैतिक आणि लष्करी यंत्रणांच्या माध्यमातून संवाद साधत आहेत,’’ असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले होते. या पार्श्वभूमीवर, जाकुन म्हणाले, ‘‘चीनने दोन्ही देशांदरम्यान झालेल्या संबंधित करारांचे आणि महत्त्वाच्या सहमतींचे नेहमीच काटेकोरपणे पालन केले आहे. प्रादेशिक सार्वभौमत्व आणि सीमावर्ती भागांतील स्थैर्य जपण्यासाठी या भागांत नियमित गस्त आणि व्यवस्थापनविषयक कार्यवाही केली जाते. भारत आणि चीन यांच्यात राजनैतिक तसेच लष्करी माध्यमांतून संवाद सुरू आहे. भारतानेही याच दिशेने प्रयत्न करावेत, दोन्ही देशांदरम्यान झालेल्या सहमतींची संयुक्तपणे अंमलबजावणी करावी आणि सीमावर्ती भागांत शांतता व स्थैर्य राखण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी चीनची अपेक्षा आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.