पुणे

चीनमध्ये बंद पडलेल्या व्यवसायांचीही कर-तपासणी

CD

चीनमध्ये बंद पडलेल्या
व्यवसायांचीही करतपासणी

आर्थिक दबावाच्या पार्श्वभूमीवर कारवाई; लघुउद्योजकांत चिंता

बीजिंग, ता. १४ (वृत्तसंस्था) : वाढत्या आर्थिक अन् वित्तीय दबावाच्या पार्श्वभूमीवर चीनमध्ये करवसुलीच्या प्रयत्नांना वेग आल्याचे वृत्त आहे. ‘द एपोक टाइम्स’च्या अहवालानुसार, देशातील विविध भागांत कर अधिकारी आधीच बंद पडलेल्या व्यवसायांची करनोंदणी पुन्हा सुरू करून त्यांच्या आर्थिक नोंदींची तपासणी करीत आहेत. ‘द एपोक टाइम्स’च्या वृत्तानुसार, काही चिनी नागरिकांनी या मोहिमेचा संबंध देशातील आर्थिक मंदी अन् स्थानिक सरकारांवरील वाढत्या आर्थिक ताणाशी जोडला आहे.

चीनमधील ‘वी चॅट’ आणि ‘डौयिन’ यांसारख्या समाजमाध्यमांवर अलीकडे प्रसारित झालेल्या चित्रफितींनुसार, करतपासणीची व्याप्ती मोठ्या कंपन्यांपुरती मर्यादित राहिलेली नसून वैयक्तिक व्यवसायांपर्यंतही पोहोचली आहे. जियांग्शी प्रांतातील एका प्रकरणात, नोंदणी रद्द केलेल्या वैयक्तिक व्यवसायाच्या मालकाला करनोंदणी पुन्हा सुरू करून तपासणीला सामोरे जाण्याचे आदेश देण्यात आल्याचे समोर आले आहे. समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या एका नोटिशीनुसार, संबंधित व्यवसायाने करपात्र उत्पन्नाची अचूक माहिती दिली नसल्याचे स्थानिक कर विभागाच्या निदर्शनास आले होते.

संबंधित व्यक्तीला पाच कामकाजाच्या दिवसांत तपासणी प्रक्रिया पूर्ण करून खर्च आणि व्ययाशी संबंधित कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले होते. या प्रकारांमुळे आधीच बंद झालेल्या व्यवसायांचीही नव्याने करतपासणी केली जाऊ शकते, अशी चिंता व्यावसायिकांमध्ये निर्माण झाली आहे. नानचांग येथील ‘शी’ आडनावाच्या एका स्वयंरोजगार व्यावसायिकाने ‘द एपोक टाइम्स’ला सांगितले की, नाश्त्याचे दुकान चालविणाऱ्या त्यांच्या एका सहकाऱ्याशी कर अधिकाऱ्यांनी व्यवसायाच्या मागील उत्पन्नाबाबत संपर्क साधला होता.

“हे अतिच झाले आहे,” अशी प्रतिक्रिया शी यांनी दिली. संबंधित व्यावसायिकाने व्यवसायाचा परवाना रद्द केला होता. तसेच दुकान दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करण्यात आले होते. तरीही कर विभागाने ऑनलाइन व्यवहारांची माहिती आणि बँक व्यवहारांच्या नोंदी जतन करून ठेवल्या असून, आता माजी मालकाच्या उत्पन्नाची तपासणी करून अतिरिक्त कर भरण्याची मागणी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित व्यावसायिक दरवर्षी कर भरत असतानाही अतिरिक्त कराची मागणी का केली जात आहे, असा प्रश्न शी यांनी उपस्थित केला.

हुनान प्रांतातील एका माजी वैयक्तिक व्यावसायिकानेही ‘द एपोक टाइम्स’ला सांगितले की, अनेक छोटे व्यापारी आधीच व्यवसाय बंद करून बाहेर पडले आहेत. काहींना मात्र आता त्यांच्या जुन्या आर्थिक नोंदींच्या तपासणीला सामोरे जावे लागत आहे. कर अधिकाऱ्यांनी अलीकडे वैयक्तिक व्यवसायांच्या जुन्या खात्यांची तपासणी सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. ‘द एपोक टाइम्स’च्या अहवालानुसार कर अधिकाऱ्यांनी सुरुवातीला शेअर बाजारात नोंदणीकृत कंपन्यांची, त्यानंतर लघु व मध्यम उद्योगांची तपासणी केली. आता त्यांचा मोर्चा वैयक्तिक व्यवसायांकडे वळला आहे.

मात्र, चीनच्या प्रशासनाने तपासणीच्या कक्षेत आणलेल्या व्यवसायांची संख्या, संबंधित प्रदेश किंवा वसूल करण्यात आलेल्या अतिरिक्त कराची रक्कम याबाबत अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. त्यामुळे समोर आलेली प्रकरणे काही विशिष्ट भागांतील कारवाईपुरती मर्यादित आहेत की बंद पडलेल्या व्यवसायांकडून कर वसुलीसाठी व्यापक मोहीम राबविली जात आहे, हे स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, या कर तपासणीवर चिनी समाजमाध्यमांवर टीकाही होत आहे. ग्राहकांची संख्या घटणे आणि उत्पन्न कमी होणे यामुळे लघुउद्योजक आधीच अडचणीत असताना त्यांच्यावर अतिरिक्त करतपासणीचा भार टाकला जात असल्याचे काही वापरकर्त्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : तलावातून निघते गणरायाची पालखी; रायगडच्या साले गावातील अनोखी परंपरा

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT