पुणे

चिंचोलीच्या जाधव मळ्यात फुलवली बागायती शेती

CD

देहूरोड, ता. १३ : चिंचोली येथील जाधव मळ्यातील १४ एकर बागायती शेती आज अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा आधार बनली आहे. पूर्वी याठिकाणी केवळ दोन ते पाच शेतकरी शेती करत होते. कालांतराने शेतीचे विभाजन झाल्यानंतर आता तब्बल १३ शेतकरी या जमिनीवर शेती करत आहेत. विशेष म्हणजे या १३ शेतकऱ्यांच्या मागे सुमारे ५० ते ६० कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.
या भागातील शेतकऱ्यांनी कष्ट आणि योग्य नियोजनाच्या जोरावर शेती समृद्ध केली आहे. येथे बाजरी, कांदा, टोमॅटो, विविध प्रकारचा भाजीपाला तसेच जनावरांसाठी वैरण घेतली जाते. यासोबतच अनेक शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायही सुरू ठेवला असून शेतीला जोडधंद्याची साथ मिळाली आहे. या शेतीसाठी असलेली विहीर जमिनीपासून सुमारे ७० ते ८० फूट खोल असून बाराही महिने पाणी उपलब्ध करून देते. भर उन्हातही मेहनतीच्या जोरावर शेती टिकवून ठेवणाऱ्या चिंचोलीतील जाधव मळ्यातील शेतकऱ्यांचा आदर्श इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik Criticises Rahul Gandhi : धनंजय महाडिकांचा राहुल गांधींवर हल्लाबोल; म्हणाले, 'निवडणूक आयोगाबद्दल चुकीची माहिती पसरवून दिशाभूल सुरू'

ICC Cricket World Cup 2027: वर्ल्ड कप 2027 चं शेड्यूल कधी जाहीर होणार? अनाउन्समेंटची तारीख समोर; जाणून घ्या कुठे होणार घोषणा

बॉलिवूडला दणका! चित्रपट निर्माते 'प्राप्तिकर'च्या रडारवर, अनेक दिग्गज सेलिब्रिटींवरही कारवाई

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Jan Shatabdi: जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड, 3 तासांपासून एकाच ठिकाणी ठप्प; प्रवाशांचा खोळंबा

SCROLL FOR NEXT