पुणे

चिंचोली जिल्हा परिषद शाळेत आनंदी बाजार उत्साहात

CD

PGR26B03385
चिंचोली ः येथील आनंद बाजाराचे उद्‍घाटन करताना सरपंच अमर कसबे, उपसरपंच अजित शिंदे, ग्रामस्थ व शिक्षिका.

चिंचोली जि. प. शाळेत आनंद बाजार
पांगरी : चिंचोली (ता. बार्शी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने बालचमूसमवेत आनंदी बाजाराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला गावातील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, ग्रामस्थ, पालकवर्ग व शिक्षणप्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या आनंदी बाजाराचे उद्‍घाटन सरपंच अमर कसबे, उपसरपंच अजित शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामस्थ, पालक तसेच माता-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचोलीच्या प्रांगणातच आनंदी बाजाराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच व्यवहाराचे ज्ञान, खरेदी-विक्रीची प्रक्रिया तसेच चालू घडामोडींची माहिती मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांच्या पालकांनी पाल्यांना सोबत घेऊन खरेदी-विक्रीत मदत करत व्यवहाराचे धडे प्रत्यक्षात देताना दिसले. या आनंदी बाजारातून अंदाजे दहा हजार रुपयांची उलाढाल झाली. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षिका पुष्पा चौधर,स्मिता नाझरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Transporters Strike: वाहतूकदारांचा मोठा निर्णय! सरकारशी चर्चेनंतर ट्रान्सपोर्ट संप पुढे ढकलला; राज्याला दिलासा, पण कधीपर्यंत?

T20 WC, IND vs ENG SF: संजू सॅमसनची वादळी अर्धशतक! गौतम, रोहित, विराटच्या विक्रमाशी बरोबरी; इशानसह ९७ धावा जोडल्या

बीएमसी जिंकताच भाजपची मोठी चाल! मुंबईत ८१ सदस्यीय नवी फौज तयार; टीममध्ये उत्तर भारतीयांचा बोलबाला, कुणाकडे कोणती जबाबदारी?

आपला स्वतःचा चित्रपट आहे असं समजून... आगामी 'राजा शिवाजी' चित्रपटाबद्दल काय म्हणाला रितेश देशमुख

Phulambri News : सुवर्ण महोत्सवी सप्ताहात नामस्मरणाचा अखंड गजर, शेलगाव खुर्द येथे हजारो भाविकांची उपस्थिती; काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता

SCROLL FOR NEXT