Animal 
पुणे

चिंचवडमधील गोठ्यामुळे दुर्गंधी (व्हिडिओ)

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - महापालिकेच्याच चिंचवड येथील झोपडपट्टी निर्मूलन आणि पुनर्वसन विभागाच्या इमारतीलगतच बेकायदा गोठा सुरू आहे. जनावरांचे मलमूत्र पार्किंगमध्ये पसरत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. पर्यायाने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍नही निर्माण झाला आहे.

शहराच्या मध्यवस्तीत गुराचा गोठा बांधण्यास कायद्याने बंदी आहे. चिंचवड येथील भाजी मंडईलगतच्या झोनिपु कार्यालयाच्या आवारात मागील बाजूस पोलिस ठाणेही आहे. तसेच खासगी रुग्णालयही आहे. झोनिपुच्या कार्यालयालगतच मोकळी जागा आहे. येथे एका व्यावसायिकाचा गोपालनाचा बेकायदा व्यवसाय सुरू आहे. येथे सुमारे १५ गुरे आहेत. या गुरांच्या मलमूत्राचे पाणी झोनिपुचे कार्यालय आणि पोलिस ठाणे असलेल्या इमारतीच्या पार्किंगमध्ये वाहत येते. या पार्किंगच्या जागेत पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकी ठेवल्या आहेत. तसेच, पोलिस कर्मचारी, झोनिपुच्या कार्यालयातील कर्मचारी, या दोन्ही ठिकाणी येणारे नागरिकही या पार्किंगचा वापर करतात. परंतु तेथे गुरांच्या मलमूत्रामुळे या सर्वांनाच दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. या पार्किंगमध्ये मलमूत्रामुळे दलदल निर्माण झाली आहे.  या इमारतीलगत छोट्या खोलीत विद्युतरोहित्र आहे. त्यालगतच गोवऱ्याही ठेवण्यात येत आहेत. 

चिंचवड ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रभाकर शिंदे म्हणाले, की या जागेबाबत गोठा व्यावसायिक आणि महापालिका यांच्यात काही वाद असल्याचे समजले आहे. गोठा बेकायदा असल्यास संबंधित व्यावसायिकाला नोटीस देतो.

दोन महिन्यांपासून महापालिकेच्या अधिकाऱ्यांना गोठा व्यावसायिकाविरुद्ध कारवाई करण्यास सांगितली. परंतु कारवाई झाली नाही. गायीच्या शेणामुळे धुनर्वाताचे जंतू इतरत्र पसरून नागरिकांच्या, रुग्णांच्या आरोग्याला धोका पोचू शकतो. 
- डॉ. दिलीप कामत, वैद्यकीय व्यावसायिक

संबंधित गोठा व्यावसायिकावर कारवाई करण्यास भूमी आणि जिंदगी विभागाला सांगितले आहे. अतिक्रमण विभागालाही कारवाई करण्याबाबत कळवितो. 
- दिलीप गावडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

कायद्यानुसार शहराच्या मध्यवस्तीमध्ये गुरांचा गोठा सुरू करता येत नाही. 
- मनोज लोणकर, सहायक आयुक्त (आरोग्य) महापालिका

गुरांच्या गोठ्याला पालिका परवानगी देत नाही. राज्याचा पशुसंवर्धन विभाग देतो. गोठ्यातील अस्वच्छतेमुळे माणसाला कोणते आजार होऊ शकतात, हे आरोग्य विभागाचे अधिकारी सांगू शकतील. 
- डॉ. अरुण दगडे, पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, Lord's ODI: इंग्लंडला RO-KO नडले, पण अखेर भारतीय संघाचा प्रयत्न तोकडे पडले! यजमानांनी विजयासह मालिकाही जिंकली

IND vs ENG: रोहित शर्माच्या शतकात LORD शार्दुल ठाकूरचं मोठं योगदान, पण कसं? जाणून घ्या नेमकं गुपित

ENG vs IND: Rohit Sharma चा लॉर्ड्सवर 'हिटमॅन' अवतार; शतक ठोकत इतिहास घडवला, गिलसोबतही केली विक्रमी भागीदारी

Parliament March Row: परवानगी मागितली नाही, दिलीही नाही; कलम १६३ लागू, संसद मार्चला दिल्ली पोलिसांचा स्पष्ट नकार

FIFA World Cup Final चा फिव्हर भारतातही! तीन राज्यातील शाळांना थेट सरकारी सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT