चिंचवड - जिजाऊ उद्यान परिसराच्या दुतर्फा पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी होते.
चिंचवड - जिजाऊ उद्यान परिसराच्या दुतर्फा पार्किंगमुळे वाहतुकीची कोंडी होते. 
पुणे

चिंचवडमधील जिजाऊ उद्यान परिसरात कोंडी (व्हिडिओ)

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - चिंचवड येथील जिजाऊ उद्यान परिसरात शनिवारी, रविवारी रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावली जातात त्यामुळे कोंडी होते. यासंदर्भात महापालिका प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

स्थानिक नागरिकांच्या अंदाजानुसार दर शनिवार, रविवार सुमारे दीड ते दोन हजार नागरिक उद्यानात येतात. उद्यानालगत महापालिकेने दुचाकी पार्किंगसाठी सुविधा केली आहे. मात्र, मोटारींच्या पार्किंगसाठी कोणतीही सुविधा नाही. त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या मोटारी रस्त्याच्या कडेलाच उभ्या कराव्या लागतात. त्यातच आजूबाजूच्या इमारतींमधील अनेक नागरिकही त्यांच्या मोटारी रस्त्यावर उभ्या करतात.

उद्यानात येणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने दुचाकी पार्किंगची जागाही खूपच अपुरी पडते. त्यामुळे मोटारींबरोबरच दुचाकीही रस्त्याच्या कडेलाच लावाव्या लागतात.

तसेच उद्यानाच्या बाहेर घोडे व्यावसायिक उभे असतात. सर्वांचा परिणाम वाहतूक कोंडीत होतो. 

उद्यानात फिरायला आलेले अनिल भोसले म्हणाले, ‘‘महापालिकेने मोटारींच्या पार्किंगसाठी व्यवस्था करावी. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे उद्यानात ये-जा करण्यासाठी रस्ता ओलांडताना ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होते. त्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी या परिसरात सायंकाळी कर्मचाऱ्याची नियुक्ती करावी.’’यासंदर्भात महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे म्हणाले, ‘‘यासंदर्भात संबंधित कर्मचाऱ्याला कोंडीची माहिती देऊन योग्य ती कारवाई करण्यास सांगतो.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update : १० जूनला भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

Sharad Pawar: "मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी..."; शरद पवारांसाठी हेमंत ढोमेचं ट्वीट

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! अमेरिकेतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

Warren Buffett: गुंतवणुकीसाठी अमेरिका ही पहिली पसंती; भारताबाबत काय म्हणाले वॉरन बफे?

SCROLL FOR NEXT