पुणे

शिवसेनेतर्फे ३० ऑगस्टला चिंचवड येथे रोजगार मेळावा

CD

पिंपरी, ता. २० : शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या मार्गदर्शनात चिंचवड येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. ३० ऑगस्टला सकाळी ९ वाजता, चिंचवडे लॉन्स येथे याचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ नगरसेविका सुलभा उबाळे आणि महापालिकेतील गटनेते विश्वजीत बारणे यांनी दिली.

या वेळी समन्वयक किरण राहणे, दीपक पवार आदी उपस्थित होते. विश्वजीत बारणे म्हणाले, ‘‘या मेळाव्यात ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, टाटा मोटर्स, हुडास टेक्नॉलॉजी, विगल स्पेस, बजाज, ह्युंदाई, डॉ. रेड्डी फाउंडेशन, बीव्हीजी इंडिया अशा आस्थापनांचे प्रतिनिधी उपस्थित राहून मुलाखती घेणार आहेत. पाचवीपासून आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर, इंजिनिअरिंग तसेच इतर उच्चशिक्षित उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, अनुभव आणि कौशल्यांनुसार रोजगाराच्या संधी दिल्या जाणार आहेत.’
दिव्यांग बांधवांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना मेळाव्याद्वारे नोकरी मिळणार नाही, त्यांना ‘खासदार शिवसेना जॉब कार्ड’चे वाटप करण्यात येणार आहे. त्यांना भविष्यातील योग्य संधींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. महिलांसाठीही या मेळाव्यात स्वयंरोजगार, उद्योजकता, कौशल्य विकास व व्यवसायाच्या संधींबाबत मार्गदर्शन आणि प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ring Road: पुणे रिंगरोडच्या कामाला 'या' गावकऱ्यांनी केला विरोध; मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना रोखलं, तातडीची ग्रामसभा घेऊन घेतला ठराव

Loose Oil Ban: महाराष्ट्रात आता खुलं तेल विकता येणार नाही! FDA चा मोठा आदेश; पॅकेटवर सोर्स आणि एक्सपायरी डेट बंधनकारक

AB de Villiers: "सचिन तेंडुलकरपेक्षा विराटच कसोटीत भारी..." डिव्हिलियर्सच्या सनसनाटी दाव्याने खळबळ

Latest Marathi News Live Update: रंकाळा परिसरातील 100 हून अधिक खाद्यगाड्यांवर कारवाई

Thane Civic Promotion : ठाणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त (१) पदावर मनीष जोशी यांची पदोन्नती; नगरविकास विभागाचा शासन आदेश जारी

SCROLL FOR NEXT