Pune Expo Inauguration sakal
पुणे

Pune Expo : चिंचवड येथे ‘एमसीसीआयए’ आयोजित पुणे एक्स्पोचे उद्‍घाटन

औद्योगिक क्षेत्रामधील उत्पादने आणि विविध समस्या सोडविण्यासाठी तीन दिवसीय ‘पुणे एक्स्पो’चे आयोजन ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲँड ॲग्रिकल्चर’तर्फे (एमसीसीआयए) ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्याच्या उद्योग क्षेत्रात मोठी क्षमता असून, त्यातून अनेकांना रोजगार उपलब्ध होत आहे. अद्ययावत तंत्रज्ञान वापरून आपण उत्पादन क्षमता वाढवत आहोत. यात सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगाचा (एमएसएमई) वाटा मोठा आहे. त्यामुळे त्यांच्या समस्यांवर लक्ष देऊन त्या सोडविणे गरजेचे आहे.

त्यावर चर्चा होऊन एक्स्पोच्या माध्यमातून उद्योग क्षेत्राला पाठबळ मिळण्यास मदत होईल, असा विश्वास अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला.

औद्योगिक क्षेत्रामधील उत्पादने आणि विविध समस्या सोडविण्यासाठी तीन दिवसीय ‘पुणे एक्स्पो’चे आयोजन ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲँड ॲग्रिकल्चर’तर्फे (एमसीसीआयए) ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे केले आहे.

उद्‍घाटन कार्यक्रमाला केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग विभागाचे सहसचिव मुख्य कार्यकारी अधिकारी अजित चव्हाण, राज्य लघु उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र निंबाळकर, व्हाइस अॅडमिरल सतीशकुमार घोरमडे (निवृत्त), किर्लोस्कर ऑइल इंजिनच्या व्यवस्थापकीय संचालक गौरी किर्लोस्कर, ‘एमसीसीआयए’चे माजी अध्यक्ष प्रदीप भार्गव आणि महासंचालक प्रशांत गिरबने उपस्थित होते.

‘एमसीसीआयए’च्या वतीने व्यवसायिकांची माहिती असलेली संपर्क पुस्तिका (डिरेक्टरी) आणि ‘संपदा’ या मासिकाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

‘एमएसएसआयडीसी’चे लक्ष्य

महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळातर्फे (एमएसएसआयडीसी) केंद्र शासनाच्या आगामी योजनेअंतर्गत राज्यात एक लाख सूक्ष्म आणि लघू उद्योगांना मदत करण्याचे लक्ष्य ठेवण्यात येणार आहे. ज्यातील ५० टक्क्यांहून अधिक ‘एमएसएमर्इ’ पाच जिल्ह्यांत आहे. या क्षेत्राच्या समस्यांवर लक्ष देऊन त्या सोडविण्याचे काम राज्य सरकार करत आहे, असे निंबाळकर म्हणाले.

हे लक्षात ठेवा

  • कधी : आठ नोव्हेंबरपर्यंत

  • कुठे : ऑटो क्लस्टर, चिंचवड

  • वेळ : सकाळी दहा ते सायंकाळी सहा

  • प्रवेश : विनामूल्य, मात्र नोंदणी आवश्यक

  • नोंदणी आणि एक्स्पोच्या अधिक माहितीसाठी www.mcciapune.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT