पुणे

चिंतामणी रात्र प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे प्रेरक यश

CD

चिंचवड, ता. ८ : आर्थिक अडचणी, नोकरी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत चिंचवड स्टेशन येथील चिंतामणी रात्र प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविले आहे.
रात्र प्रशालेचा यंदाचा दहावी निकाल अनुक्रमे ८२.३५ टक्के, तर बारावीचा ५७.१४ टक्के लागला आहे. अनेक विद्यार्थ्यांनी वर्षानुवर्षांचा शैक्षणिक खंड पार करत यश संपादन केले आहे. चिंतामणी प्रशालेचा दहावीचा निकाल ८२.३५ टक्के लागला. त्यामध्ये सुनील जाधव (५७ टक्के), रितिका अवसरमल व साहिल बनसोडे (५५ टक्के), तर पूजा चव्हाण (५४.२० टक्के) हे उत्तीर्ण झाले आहेत. तर, नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात सायली वारके, ज्योती निसर्गंध, शुभांगी काटे आदींनी यश मिळवले, अशी माहिती प्राचार्य दिलीप लंके यांनी दिली.

मी एका कंपनीत हेल्पर आहे. १३ वर्षानंतर मी तसेच पत्नी शीतल आम्ही दोघांनी मागील वर्षी नववीमध्ये प्रशालेमध्ये प्रवेश घेतला. आम्ही दोघेही दहावी उत्तीर्ण झालो आहोत. त्याचा विशेष आनंद आहे. यापुढेही प्रपंच सांभाळत आम्ही शिकणार आहोत.
- सुनील जाधव, विद्यार्थी

संसार आणि शिक्षणाचा समतोल साधत वीस वर्षांनंतर मी बारावी उत्तीर्ण होण्याचा आनंद व्यक्त केला. पती, मुलगा आणि मुलगी अशा कुटुंबाची जबाबदारी सांभाळत दररोज रात्री दोन तास अभ्यास करून वीस वर्षांपूर्वीचे अपूर्ण स्वप्न पूर्ण केले. माझा मुलगा सध्या बी.फार्मसीचे शिक्षण घेत असून मुलगीही यंदा बारावी उत्तीर्ण झाली आहे.
ज्योती निसर्गंध, विद्यार्थिनी

शिक्षण पूर्ण करून स्वतःचे भविष्य घडविण्याचा या विद्यार्थ्यांचा प्रयत्न प्रेरणादायी आहे. समाजातील कष्टकरी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य आम्ही करत आहोत.
- दिलीप लंके, प्राचार्य, चिंतामणी रात्र प्रशाला

PNE26W17760

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'गोकुळ'वर ताबा मिळवण्याचा प्रश्नच नाही! CM फडणवीसांनी सांगितलं संचालक नेमण्यामागचं नेमकं कारण

Farmer ID: ७/१२ वर नाव नसले तरी मिळणार शेतकरी ओळखपत्र; राज्यातील १.६ लाख शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी

IND vs NZ: दोन सिक्स अन् रोहित शर्माने मोडीत काढला शाहिद आफ्रिदीचा विक्रम! या खास यादीत 'हिटमॅन' नंबर-१

Trending News: ज्याने नोकरी दिली, त्याचेच 170 कोटी लुटले! महिलेचा घरातील अजब कारनामा पाहून पोलीसही चक्रावले

Latest Marathi News Live Update: नालासोपाऱ्यात आगीच्या तांडव; दोन गाड्या जळून खाक

SCROLL FOR NEXT