पुणे

चिंचडवच्या महावीर चौकांचा श्‍वास कोंडला

CD

पिंपरी ता. २४ ः मोटारींची बेशिस्‍त पार्किंग, मेट्रोच्‍या कामाचा अडथळा, रस्‍त्‍याला अडथळा ठरणारे अतिक्रमण अशा अनेक प्रश्‍नांमुळे या चौकात बकालपणा वाढला आहे. परिणामी, या चौकातून वाट काढताना वाहनचालकांना अवघड जाते. तर, पादचारी नागरिकांना जीव मुठीत धरून वाट काढावी लागते. या समस्‍यांकडे ना वाहतूक पोलिस लक्ष देत ना महापालिका प्रशासन.
चिंचवड स्‍थानक येथील महावीर चौकातून पुढे चिंचवड स्‍थानकापर्यंत मेट्रोचे काम सुरू असल्‍याने सेवा रस्‍ता बंद केला आहे. त्‍यामुळे आकुर्डीच्‍या दिशेने येणाऱ्या वाहनचालकांना इथून डाव्‍या मार्गाच्‍या रस्‍त्‍याने चिंचवड पोलिस वसाहत मार्गाने पुन्‍हा चिंचवड स्‍थानकाच्‍या दिशेने यावे लागते. दरम्‍यान, या चौकात बेशिस्‍त वाहनांच्‍या पार्किंगमुळे वाहनांची कोंडी होते. या चौकातच दोन्‍ही बाजूला मोटारी पार्क केलेल्‍या असतात. त्‍यामुळे अवजड वाहने, बस यांना वळण घेताना अडथळा निर्माण होतो. चिंचवड स्‍थानकाच्‍या वाहनांना देखील मोहननगरमार्गे एमआयडीसीकडे जाताना या बेशिस्‍त वाहनांच्‍या पार्किंगमधून वाट काढावी लागते.
या चौकातच मेट्रोचे काम सुरू असल्‍याने महावीर चौकातच पत्रे लावून रस्‍ता बंद केला आहे. त्‍यामुळे त्यासमोरच अनेकदा वाहने पार्क केली जातात. या चौकात वाहनचालकांना शिस्‍त लागावी, यासाठी आयलंड उभारले आहेत. त्‍यानजीक या ठिकाणी वाहने पार्क केलेली असतात.

कामगारवर्गाकडून संताप
चिंचवड, भोसरी या एमआयडीसीकडे जाण्‍यासाठी हा जवळचा मार्ग आहे. त्‍यामुळे शहरातील अनेक कामगार हा रस्‍ता वापरतात. पण, नेमके कंपनीत जाण्‍याच्‍या वेळेला या ठिकाणी अशा बेशिस्‍त पार्किंगमुळे तेथून मार्ग काढावा लागतो.

या चौकात मोटारी पार्क केल्‍या जातात. मोहननगर येथून उलट्या बाजूने देखील वाहने या चौकात येतात. त्‍यातच पावसाच्‍या दिवसांत वाहने अचानक दिसून येत नाहीत. अपघाताला निमंत्रण ठरू शकते.
- सुभाष जावळे, कामगार, चिंचवड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT