पुणे

‘एमएनजीएल’च्या निष्काळजीपणाने पाणी संकट

CD

चिंचवड, ता.१९ : ऐन कडक उन्हाळ्यात एमएनजीएलच्या निष्काळजीपणे केलेल्या खोदकामामुळे चिंचवडगावातील गोखले पार्क, गांधी पेठ, रेणुका अंगणसह अनेक परिसरांमध्ये सोमवारी (ता.१९) तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली. नियमितपणे एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठा देखील न झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
चिंचवडगाव परिसरात आधीपासूनच अनेक ठिकाणी कमी दाबाने व काही ठिकाणी गढूळ पाणी येत असल्याच्या तक्रारी असताना हा प्रकार घडला. अनेक नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी चिंचवडगाव भाजी मंडईतील ‘वॉटर एटीएम’चा आधार घ्यावा लागला. तेथेही पाण्यासाठी रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मिळालेल्या माहितीनुसार, पाणीपुरवठ्याच्या आदल्या दिवशी एमएनजीएलकडून गॅस वाहिनी टाकण्याचे खोदकाम सुरू होते. या कामादरम्यान दोन ते तीन ठिकाणी मुख्य पाणी वाहिन्या फुटल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, याबाबत पाणीपुरवठा विभागाला वेळेत माहिती देण्यात आली नसल्याचा आरोप पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी केला आहे. पाणी सोडल्यानंतर मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाल्याने प्रशासनाला तत्काळ पुरवठा बंद करावा लागला. वाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम दिवसभर सुरू राहिल्यानंतर सायंकाळी उशिरा काही भागांत पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.

‘‘नियमित पाणीपुरवठ्याच्या दिवशी देखील पाणी मिळत नसल्याने आम्हा नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. कधी गढूळ पाणी, कधी कमी दाबाने तर कधी अतिक्लोरिनयुक्त पाणी येत असल्याने अलीकडे पाणीपुरवठ्याच्या समस्या वाढल्या आहेत. पाण्याचा साठा नसल्याने स्वयंपाकासाठी वॉटर एटीएमवर रांगेत उभे राहून पाणी आणावे लागले, तर आंघोळीचेही हाल झाले.’’
- मयूर लुंकड, रहिवासी, चिंचवडगाव

‘‘चिंचवडगाव परिसरात एमएनजीएलकडून सुरू असलेल्या कामादरम्यान दोन ते तीन ठिकाणी पाण्याच्या मुख्य वाहिन्या फुटल्यामुळे काही ठिकाणी सकाळी नियमित पाणीपुरवठा सुरू केल्यानंतर गोखले पार्कसह अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तातडीने पाणीपुरवठा बंद करावा लागला. या संदर्भात एमएनजीएलकडून वाहिन्या फुटल्याची पूर्वकल्पना देण्यात आली नसल्यामुळे ही परिस्थिती उद्‍भवली. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर सर्व ठिकाणचा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येईल.’’
- शरद मोरमारे, उपअभियंता, पाणीपुरवठा, ‘ब’ क्षेत्रीय कार्यालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात एल्गार; ७८ गावातील शेतकरी ९ जूनला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार

BAN vs PAK 2nd Test: फिफ्टी हो गई, अब ड्रामा शुरू हो जाएगा! मोहम्मद रिझवानचे live मॅचमध्ये लिटन दाससोबत जोरदार भांडण Video

IND VS AFG 2026 SQUAD: "त्याची चर्चाच झाली नाही..."; मोहम्मद शमीला वगळण्यावर अजित आगरकरचं स्फोटक वक्तव्य

Latest Marathi News Live Update : केदारनाथ मंदिरासाठी चालवल्या जाणाऱ्या हेलिकॉप्टर सेवा खराब हवामानामुळे स्थगित

Shirur Police Crackdown: शिरूर पोलिसांची गावठी व बेकायदा दारूविक्रीवर धडक कारवाई; हातभट्ट्या उध्वस्त

SCROLL FOR NEXT