Chaphekar-Chowk
Chaphekar-Chowk 
पुणे

चिंचवडला भुयारी मार्गाचे नियोजन

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - वाढती वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी महापालिकेच्या वतीने चिंचवड येथील चापेकर चौकात भुयारी मार्ग करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे १४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. येत्या महिन्याभरात प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे.

या चौकातील कोंडी सोडविण्यासाठी चापेकर उड्डाण पूल उभारला. मात्र, मुळातच अरुंद पूल आणि वाहनांची वाढती संख्या यामुळे कोंडीत भर पडत आहे. त्यातच चापेकर पुतळा परिसरात विक्रेत्यांची संख्याही गेल्या काही वर्षांत वाढली आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभागाच्या वतीने कधीतरी येथील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येते. याच चौकाच्या परिसरात टपाल कार्यालय, महापालिकेची शाळा, चिंचवड पोलिस ठाणे, भाजीमंडई, खासगी शाळांकडे जाणारा मार्ग आहे. चौकातून वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात होतो.

त्यामुळे या चौकाच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी रस्ता ओलांडताना आजारी, वृद्ध, शालेय मुले यांना तारेवरची कसरत करावी लागते.
चिंचवडगाव, बिजलीनगर, चिंचवड स्टेशन, लिंक रस्ता, दळवीनगर, थेरगाव, तानाजीनगर आदी ठिकाणांकडे ये-जा करण्यासाठी भुयारीमार्गाचा उपयोग होईल. या भुयारी मार्गातून ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येणार आहे.  भुयारीमार्गातील २५ गाळे परिसरातील फेरीवाल्यांना नाममात्र दराने भाडेपट्टा तत्त्वावर देण्यात येणार आहेत. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नातही भर पडेल.

भुयारीमार्गाचे काम करताना पुलाच्या खांबांना कोणताही धोका पोचणार नाही, याची दक्षता घ्यावी लागणार आहे. या कामासाठी परिसरातील सर्व सेवा वाहिन्या स्थलांतरित कराव्या लागतील. तसेच या कामासाठी सुमारे दोन वर्षांचा कालावधी लागेल. सध्या कामाच्या निविदांची छाननी सुरू आहे. पुलाच्या खांबांच्या बाजूने पाच मीटर अंतरावर आणि रस्त्याच्या शेवटी आरसीसी भिंत बांधण्यात येईल. तसेच एका बाजूचे काम सुरू करण्यात येईल आणि एक बाजू वाहतुकीसाठी खुली ठेवण्यात येईल. 
- चंद्रकांत धानोरकर, उपअभियंता, ‘ब’ प्रभाग, महापालिका

चापेकर चौकाचा परिसर - २२८२ चौरस मीटर
भुयारी मार्गात बांधण्यात येणाऱ्या गाळ्यांची संख्या - २५
गाळ्यांचे क्षेत्रफळ - २६२.५० चौरस मीटर

वैशिष्ट्ये
 खेळत्या हवेसाठी ३ डोम, भुयारी मार्गाची उंची १५ फूट
 अग्निरोधक, सीसीटीव्ही यंत्रणा
 सफाई कर्मचारी, ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती
 आपत्कालीन स्थितीसाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा
 आधुनिक विद्युत यंत्रणा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs SA W: भारत दौऱ्यावर येणार दक्षिण आफ्रिका संघ! BCCI ने केली शेड्युलची घोषणा, पाहा कधी आणि केव्हा होणार सामने

PM Modi: ना घर, ना जमीन; पंतप्रधान मोदींची किती आहे संपत्ती? शपथपत्रातून आलं समोर

Video: PM मोदींना जिरेटोप घातल्याने वाद पेटला! संभाजी ब्रिगेड आणि शरद पवार गट आक्रमक

Mumbai Rain: मुंबईकरांना IMD चा इशारा! पुढील 3 ते 4 तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, काळजी घेण्याचा सल्ला

Video: हिंदू-मुस्लीम ज्या दिवशी करेन, त्या दिवशी...; 'जास्त मुलांच्या' वक्तव्यावर PM मोदींनी दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT