torna.jpg 
पुणे

तोरणा गडाच्या देखभालीची चिंतामणी ज्ञानपीठाने घेतली जबाबदारी

मनोज कुंभार

पुणे (ता.२०)- गडकिल्लांचे दैनदिन देखभाल व संवर्धनासाठी राज्याच्या पुरातत्व विभागाने सामाजिक संस्था दायित्व अंतर्गत उपक्रम सुरु केला असून सिंहगड किल्ल्यानंर पुणे जिल्ह्यात दुसरा पथदर्शी प्रकल्प म्हणून स्वराज्याचे तोरण ठरलेल्या ऐतिहासिक तोरणा किल्ल्याची जबाबदारी पुणे येथील चिंतामणी ज्ञानपीठ संस्थेने स्विकारली आहे. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष व नगरसेवक विजय ऊर्फ (अप्पा) रेणुसे यांच्या चिंतामणी ज्ञानपीठ या शिक्षण संस्थेने पुढाकार घेतला आहे.

पुण्यातल्या लॉकडाउनवरून खासदार बापट यांचा अजित पवारांना टोला; पाहा काय म्हणाले!
चिंतामणी ज्ञानपीठाचे अध्यक्ष विजय रेणुसे यांनी या सेवाभावी उपक्रमासाठी पुढे येवून पुरातत्व विभागाच्या आवाहनानुसार किल्ल्याच्या देखभाल, संवर्धन, तोरणा किल्ल्यासाठी दोन पहारेकरी यांच्या मासिक वेतनाची जबाबदारी स्विकारली असून प्रतिमाह प्रत्येकी दहा हजार प्रमाणे वीस हजार रुपये महिन्याला ते खर्च करणार आहेत. पुढचा महिना ऑगस्टपासुन या ठिकाणी हे पहारेकरी नेमले जाणार आहेत. वेल्हे तालुक्यात किल्ले तोरणा किल्ल्यावर हजारो पर्यटक येत असतात तालुक्याचे वैभव म्हणून किल्ले तोरण्याकडे पाहिले जाते. किल्ल्यावर पुरातत्व विभागाकडून एक कर्मचारी सध्या काम करीत आहे. 

किल्याच्या विस्तार मोठा असून किल्ल्यावरील तोरणजाई मंदिर,मेंगाईदेवीचे मंदिर,
बिन्नी दरवाजा ,तोफगोळा कोठार , भुयारी मार्ग ,तटबंदी यांच्यासह पर्यटकांना सुचना देणे येथील गैरप्रकार रोखण्यासाठी व पावित्र्य राखण्यासाठी आता पुरातत्व विभागास येथे पुरेशे मनुष्यबळ उपलब्ध होणार असून वेल्हे तालुक्यातील नागरीकांसह किल्लेप्रमींनी या उपक्रमाची वाहवा केली असून रेणुसे यांच्या या शिवकार्यासाठी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून भाजपला प्रत्युत्तर; अजित पवारांवरील टीकेची केली...
विजय रेणुसे म्हणाले की, मी किल्ले तोरणा व राजगडच्याच मातीतील पाबे (ता.वेल्हे) येथील मुळचा रहिवासी असून या मातीची नाळ जोडलेली असून छत्रपतींच्या वास्तुची सेवा करण्याचे भाग्य आम्हास मिळाले असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ह्या  शिवकार्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहणे म्हणाले पुणे जिल्ह्यातील इतरही किल्ल्यावंर हा उपक्रम राबविणार असून सामाजिक संस्थांनी यासाठी पुढे यावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT