Chipko Agitation sakal
पुणे

Pune Agitation : वृक्षतोडी विरोधात पुणेकरांचे चिपको आंदोलन

पुणे महापालिकेतर्फे सध्या बंडगार्डन ते मुंढवा या दरम्यान नदी काठ सुधार प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम करताना नदी काठची हजारो झाडे काढली जाणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

पुणे महापालिकेतर्फे सध्या बंडगार्डन ते मुंढवा या दरम्यान नदी काठ सुधार प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम करताना नदी काठची हजारो झाडे काढली जाणार आहेत.

पुणे - नदी काठ सुधार प्रकल्पाअंतर्गत नदी काठची झाडे तोडून पर्यावरणाला धोका निर्माण केला जात असल्याचा आरोप करत शहरातील पर्यावरण प्रेमी नागरिकांनी संभाजी उद्यान ते नदी काठचा रस्ता अशी फेरी काढून यास विरोध केला. तसेच नदी काठी असलेल्या झाडांना आलिंगन देऊन चिपको आंदोलनाद्वारे झाडे तोडू नका अशी मागणी केली.

पुणे महापालिकेतर्फे सध्या बंडगार्डन ते मुंढवा या दरम्यान नदी काठ सुधार प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम करताना नदी काठची हजारो झाडे काढली जाणार आहेत. याविरोधात शहरातील पर्यावरण प्रेमी नागरिकांनी ही झाडे काढू नयेत अशी भूमिका घेत गेल्या काही दिवसांपासून विरोध सुरू केला आहे. झाडे तोडू नयेत यासाठी चिपको आंदोलनात पुणेकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केले होते. त्यानुसार आज सायंकाळी संभाजी उद्यान ते नदी काठी गरवारे पुलाच्या खालपर्यंत फेरी काढण्यात आली. यावेळी ‘आरएफडी हाय हाय’, ‘नदी काठ सुधार प्रकल्प रद्द करा’, ‘वाचवा वाचवा पर्यावरण वाचवा, झाडे वाचवा’ अशा घोषणा देण्यात आल्या.

हे नागरिक भिडे पुलापासून नदी पात्रात आल्यानंतर त्यांनी तेथे झाडांना आलिंगन देऊन चिपको आंदोलन केले. तसेच नदीच्या बाजूने मानवी साखळी करून पर्यावरण रक्षणासाठी एकत्र या असे आवाहन यावेळी पुणेकरांना करण्यात आले.

मुख्यसभेत पाठिंबा अन आज विरोध

महापालिकेच्या मुख्यसभेमध्ये नदी काठ सुधार प्रकल्पाला भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यासह सर्व पक्षांनी एकमुखी पाठिंबा देत मध्यरात्री हा विषय मंजूर केला होता. मात्र आज या प्रकल्पाविरोधात आंदोलन होत असताना यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यासह इतर पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. त्यामुळे सभागृहात पाठिंबा आणि रस्त्यावर विरोध अशी स्थिती दिसून आली.

दुर्मिळ वृक्ष काढले जाणार नाहीत

समाज माध्यमावर नदी पात्रातील ६ हजार झाडे काढले जाणार आहेत अशी माहिती पसरवली जात आहे. पण या अफवांवर विश्‍वास ठेवू नये. हे काम करताना ३ हजार १४२ झाडे न काढता त्यांचे जतन केले जाणार आहे. तसेच ही झाडे काढली जातील त्याबदल्यात ६५ हजारापेक्षा जास्त वृक्षारोपण केले जाणार आहे. बाधित होणाऱ्या झाडांमध्ये जुनी व दुर्मिळ झाडांचा समावेश नाही. जी झाडे काढली जाणार आहेत त्यामध्ये बहुतांश झाडे ही सुबाभूळ, बाभूळ,विलायत चिंच यांचा समावेश आहे. हा प्रकल्प भविष्यातील पर्यावरण बदल, पूरस्थिती यांना तोंड देण्यास सक्षम आहे असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

SCROLL FOR NEXT