chitra wagh Team eSakal
पुणे

'अखेर पीडिता गोव्यात सापडली.. इंजेक्शन देऊन नेण्यात आलं'

सकाळ डिजिटल टीम

पुणे: मागील काही दिवसांपूर्वीपासून शिवसेनेचे (shivsena) उपनेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांच्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या पिडीत तरूणीची कहाणी भाजपच्या (BJP) भाजपच्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी पत्रकारांना याआधी ऐकवली होती. कुचिक यांच्यावर पुण्यातील शिवाजीनगर पोलिस (Police) ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून आता भाजपच्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Tackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धारेवर धरलं आहे. जर का कुचिकवर कोणतीही कारवाई झाली नाही आणि त्या पिडित मुलीच काही बरं-वाईट झालं तर त्याला जबाबदार राज्य सरकार असेल, असंही त्यांनी ठणकावून सांगितलं आहे. ही पीडिता गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केला होता. त्याचसंदर्भात आता त्यांनी नवं ट्विट करत माहिती दिली आहे.

चित्रा वाघ यांनी म्हटलंय की, शिवसेना नेता रघुनाथ कुचिक बलात्कार प्रकरणातील मुलगी दोन दिवसांपासून गायब होती. ही गायब मुलगी गोवा राज्यातील मडगावच्या कोलवा गावामध्ये सापडली आहे. काल रात्री तिचा फोन मला आला होता. तिला इंजेक्शन देऊन काही व्यक्तींनी नेलं होतं. या व्यक्तींमध्ये पोलिसही होते. या पीडितेला महाराष्ट्रातून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तिच्याकडून काही कागदपत्रांवर सह्या देखील घेण्यात आल्याची माहिती तीने स्वत: मला दिली आहे. यासंदर्भात मी पुणे पोलिसांना सविस्तर कळवलंय, असंही त्या म्हणाल्या आहेत.

मागेही याच प्रकरणामध्ये कारवाई व्हावी, म्हणून बोलताना त्या म्हणाल्या होत्या की, पूजा चव्हाण प्रकरणाप्रमाणे या तरुणीचे करु नका. संजय राठोड़नंतर कुचिक प्रकरणात पुणे पोलिसांची भूमिक संशयास्पद आहे. नागपुर विद्यापीठातील एका विद्यार्थीने प्राध्यापकावर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. हे प्रकार गंभीर आहेत.'असेही वाघ यांनी स्पष्ट केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : मनसेचा दीपोत्सव रद्द! यंदा शिवाजी पार्कवर कार्यक्रम नाही, राज ठाकरेंची मोठी घोषणा, नागरिकांनाही आवाहन, काय म्हणाले?

IPS अनुराग कोण? SP पदावरून हटवलं, बदलीनंतर ४ दिवसात राजीनामा; M.Tech नंतर UPSCत मिळवलेलं यश

Latest Marathi News Live Update: 'गोकुळ'मध्ये शासन नियुक्त सदस्यांचा निर्णय आज; मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष

IND vs NZ 1st ODI Live : अर्शदीप सिंगचा भन्नाट मारा; गुरनूर, अंशुलची साथ अन् रोहित, विराटची जबरदस्त फिल्डिंग; बरंच काही घडलं

Gokul Election Controversy : 'गोकुळ'मध्ये कौल आपल्यालाच मिळाला, अशा आविर्भावात राहू नका; आमदार सतेज पाटलांच्या पत्राला महायुतीचे जोरदार प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT