पुणे

चिव्हेवाडी घाटात भीषण वणवा

CD

परिंचे, ता. २४ : पुरंदर तालुक्यातील चिव्हेवाडी घाटात मंगळवारी (ता. २४) दुपारी एकच्या सुमारास भीषण वणवा लागला. या आगीत मोठ्या प्रमाणावर वनातील वाळलेले गवत जळून खाक झाले असून, सरपटणारे प्राणी व पक्ष्यांच्या अधिवासाला मोठी झळ बसली आहे. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक मजुरांच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली.
सासवड ते कापूरहोळ रस्त्यावरील चिव्हेवाडी घाटात वाळलेले गवत आणि वाढत्या उष्णतेमुळे आग वेगाने पसरली. रस्त्याने प्रवास करणाऱ्यांनी टाकलेल्या जळत्या बीडी-काडीमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या परिसरात ससे, तरस, लांडगे, मोर आणि विविध सरपटणाऱ्या प्राण्यांचे वास्तव्य आहे. आगीमुळे या जैवविविधतेचे मोठे नुकसान झाले आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल गणेश पवार, वनरक्षक योगेश नजन, अक्षय लव्हाळे व वनमजुरांनी आग आटोक्यात आण्यासाठी परिश्रम घेतले.


जंगलाला आग लावणाऱ्यांविरुद्ध भारतीय वनअधिनियम १९२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. यामध्ये दोन वर्षांची शिक्षा व पाच हजार रुपये दंडाची तरतूद आहे. आग लावणाऱ्यांची माहिती देणाऱ्यास वनविभागातर्फे बक्षीस दिले जाईल व त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल.
- सागर ढोले, वनपरिक्षेत्र अधिकारी सासवड


-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT