aundh sakal
पुणे

‘स्ट्रीट्स फॉर पीपल’साठी पाषाण-सूस रस्त्याची निवड

या स्पर्धेमध्ये सुमारे वीस स्पर्धकांनी भाग घेतला असून, त्यांनी सादर केलेल्या आराखड्याची छाननी करून यातून सर्वोत्तम चार आराखड्यांची निवड करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

औंध : केंद्र सरकारने स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत आयटीडीपी या संस्थेच्या सहकार्याने आयोजित केलेल्या स्ट्रीट्स फॉर पीपल ( ‘Streets for People’)या देश पातळीवरील स्पर्धेसाठी महापालिकेच्या वतीने पाषाण-सूस (pashan-sus road) या रस्त्याची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये सुमारे वीस स्पर्धकांनी भाग घेतला असून, त्यांनी सादर केलेल्या आराखड्याची छाननी करून यातून सर्वोत्तम चार आराखड्यांची निवड करण्यात आली. रस्त्यावर पादचारी व सायकलस्वार केंद्रित सुविधा निर्माण करणे हा या स्पर्धेचा उद्देश असून या अनुषंगाने महापालिकेने (pmc) शनिवार आणि रविवार रोजी स्थानिक नागरिकांकडून अभिप्राय आणि सूचना मिळाव्यात या दृष्टीने अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. (Choice of stone-paved road for ‘Streets for People’)

लोकांच्या सहभागातून पाषाण-सूस रस्त्याची रचना करणे या उद्देशाने दोन दिवस सायकलस्वार, लहान मुले, मनपा अधिकारी आणि नागरिक यांना एकत्र आणून त्यांच्या समस्या व कल्पना जाणून घेण्यासाठी सायकल स्वारी, लहान मुलांचे खेळ, हास्य योगा, अधिकाऱ्यां‍बरोबर चाय पे चर्चा असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

शनिवारी सकाळी या कार्यक्रमाची सुरुवात उपमहापौर सुनीता वाडेकर, स्थानिक नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, राहुल कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन पथ‌ विभागाचे कार्यकारी अभियंता दिनकर गोजारे, उपअभियंता अजित सुर्वे व अशासकीय संस्था सेफ किड्स, रास्ता फॉर स्ट्रीट्स, ‘आयटीडीपी’ व अभिनव कला महाविद्यालय यांच्या सहयोगाने करण्यात आले होते.

पुढच्या टप्प्यात नागरिकांकडून प्राप्त अभिप्राय व सूचना यांचा विचार करून रस्त्याचा अंतिम आराखडा तयार करण्यात येईल व पुढील दोन वर्षांच्या कालावधीत या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. नागरिकांनी आपल्या सूचना व अभिप्राय punes4pchallenge@gmail.com या ई-मेलवर पाठवावेत असे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR Live : मुंबई इंडियन्सने १४ वर्षांचा 'शाप' संपवला! IPL मधील सर्वात मोठा विजय मिळवला; रोहित, रिकल्टनची मॅच विनिंग खेळी

कोल्हापूरची अमृता पुजारी महिला महाराष्ट्र केसरी; वेदिकाला अस्मान दाखवत जिंकली चांदीची गदा अन् कार

अपहरणकर्त्यांचा कॉल ‘तुमचा मुलगा आमच्या ताब्यात, ५० लाख द्या, पोलिसांत गेल्यास मुलाला ठार मारु’; सोलापूर पोलिसांच्या ‘एलसीबी’ची १४ तासांची मेहनत अन्‌...

MI vs KKR Live: रोहित शर्माची IPL इतिहासातील वेगवान फिफ्टी! ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, 'फॅब फोअर'च्या पंक्तित बसला

Land Survey: भूमापन प्रक्रिया होणार वेगवान! फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय; जमीन मोजणीसाठी नवी योजना लागू

SCROLL FOR NEXT