चोपडी ग्रामपंचायतीची चौकशी
करण्याची निवेदनाद्वारे मागणी
पाटण, ता. २० : दलित वस्तीचा निधी खर्च करत नाहीत, गेली तीन वर्षे तोंडी व लेखी निवेदन देऊनही पिण्याचे पाणी पुरेसे व वेळेत मिळत नाही, नळ पाणीपुरवठा कर्मचारी कायम नशेत असतो, सरपंचांना विचारणा केली, तर दमदाटी केली जाते, असा कारभार करणाऱ्या चोपडी ग्रामपंचायतीची चौकशी करून कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा चोपडी गावातील बौद्ध व मातंग वस्तीतील नागरिकांनी पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला निवेदनाद्वारे दिला.
निवेदनात म्हटले, की निवेदन देऊनही सरपंच काहीही कारवाई करत नाहीत. प्रत्यक्ष भेटून सांगितले, तर अरेरावीची भाषा करतात. हा सर्व प्रकार तीन वर्षे चालू आहे. वीस वर्षांपूर्वी बांधलेली पाण्याची टाकी नादुरुस्त आहे. पाणी सोडणारा कर्मचारी कायम नशेत असतो. या दोन वस्त्यांना वेळी-अवेळी पाणी सोडतो. तक्रार केली, तर सरपंच संबंधित कर्मचाऱ्याला पाठीशी घालतात.
सरपंचांच्या गल्लीत २४ तास पाणी असते. त्यामुळे त्यांना या समाजाशी काही देणेघेणे नाही. मनमानी चाललेला कारभार बंद करून दलित वस्त्यांना पुरेसा व वेळेवर पाणी मिळावे, दलित वस्तीचा निधी खर्च करावा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा निवेदनात दिला आहे. निवेदनावर दोन्ही वस्तीतील रहिवाशांच्या सह्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.