Kondhwa 
पुणे

Pune Wall Collapse : रात्री दीडला किंकाळ्या ऐकू आल्या अन्...

प्रविण डोके

पुणे : 'रात्री दीड वाजता अचानक मोठा आवाज झालेला ऐकला. काय झाले म्हणून खिडकीतून बाहेर पाहतो तर सोसायटीची भिंत खाली कोसळलेली दिसली. तिथून लोकांचा किंचाळलेला आवाज येत होता. मी ताबडतोब घराच्या बाहेर पडून शेजाऱ्यांना उठवून खाली आलो... सांगत होते  अॅल्कॉन स्टायलस सोसायटीच्या नवव्या मजल्यावर राहणारे बुरान वागाजी पुरवला...

'लगेच अग्निशामक दल आणि पोलिसांना फोन केला. आम्ही सोसायटीतील नागरिकांनी लगेच लोकांना तिथून बाहेर काढायला सुरूवात केली. काहीवेळ पोलिस आणि अग्निशामक दल पोहोचले सोसायटीतील नागरिक, पोलिस आणि अग्निशामक दलाच्या लोकांनी पहाटे चार वाजेपर्यंत 9 ते 10 मृतदेह बाहेर काढले होते.' एनडीआरएफ पोलिस उशिरा आल्याचे पुरवला यांनी सांगितले.

दरम्यान, बांधकाम व्यावसायिकाने मजुरांना राहण्यासाठी शेजारीच असलेल्या एका सोसायटीच्या संरक्षक भिंतीजवळ "ट्रांझिट  कॅम्प"च्या झोपड्या थाटल्या. याच झोपड्यात कामगार व त्यांचे कुटुंब गेल्या काही दिवसांपासून वास्तव्य करीत होते. शुक्रवारी दिवसभर काम सुरु असतानाही कामगारांनी इमारतीमध्ये काम केले. त्यानंतर सर्वजण सायंकाळी काम संपल्यानंतर नेहमीप्रमाणे एकत्र गप्पागोष्टी करीत होते. महिलांनी जेवण बनवून सर्वांनी जेवण केले. काही वेळ मुलांसमवेत खेळले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी काम करण्यासाठी लवकर उठण्यासाठी सर्वजण झोपी गेले. 

सगळेजण पहाटेच्या साखरझोपेत असतानाचा ज्या भिंतीच्या आधाराने त्यांचे संसार फुलू लागले होते, त्याच भिंतीने घात केला. ती भिंत त्यांच्या झोपडयावर कोसळली. त्यामध्ये 16 कामगार, त्यांच्या बायका-मुलांचाही मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Novak Djokovic: जोकोविच आप्पाचा विषय लय हार्डए... विम्बल्डननेच शेअर केला मराठी गाण्यावर Video; एकदा पाहाच

Modi Government Farmers Gift: मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; कॅबिनेटमध्ये घेण्यात आले तीन महत्त्वाचे निर्णय!

Gautami Naik Exclusive: गल्ली क्रिकेट ते स्मृती मानधनाची बॅटिंग पार्टनर! किरण मोरेंनी हेरलेल्या गौतमी नाईकचा कसा राहिला प्रवास

Sun Transit Cance: १६ जुलैपासून सूर्याचा कर्क राशीत प्रवेश! वृषभ, धनु आणि मीन राशींना मिळणार विशेष लाभ, जाणून घ्या तुमचं राशी भविष्य

Uddhav Thackeray-Eknath Shinde Video: ''ते आले, त्यांनी पाहिलं अन् मग त्यांनी...'' ; उद्धव ठाकरे अन् एकनाथ शिंदे आमने-सामने!

SCROLL FOR NEXT