पुणे

चंकी पांडेंच्या गाण्यांना सोलापुरकरांची भरभरून दाद

CD

चंकी पांडे यांच्या गाण्यांना सोलापूरकरांची भरभरून दाद
ग्रामीण पोलिसांच्या ‘संगीत वारी’त वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अंमलदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २३ : रुपेरी पडद्यावर नेहमी दिसणारे ज्येष्ठ हिंदी चित्रपट अभिनेते चंकी पांडे शनिवारी सोलापुरात आले होते. त्यांनी एकेकाळी गाजलेली गाणी सादर करीत नृत्याचा ठेका धरला. त्यांच्या कलेला सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह अंमलदारांनी भरभरून दाद दिली. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने त्यांनी सादरीकरणाला सुरुवात केली.
पंढरपूर आषाढी वारीच्या बंदोबस्ताचे उत्कृष्ट नियोजन करून वारी यशस्वी पार पाडल्याबद्दल सोलापूर ग्रामीण पोलिसांतर्फे शनिवारी (ता. २२) रात्री ग्रामीण मुख्यालयाच्या मैदानावर ‘संगीत वारी’ सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणी पूजनाने कार्यक्रमाचे उद्‍्घाटन झाले. यावेळी पोलिस आयुक्त एम. राजकुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, पोलिस उपायुक्त वृष्टी जैन, प्रीतम यावलकर, अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे आदी उपस्थित होते.
प्रारंभी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी चंकी पांडे यांचे स्वागत केले. कार्यक्रमातील कलावंतांचा विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला. बॉलिवूड पार्श्वगायिका कविता राम, ‘मी होणार सुपरस्टार’ फेम गायिका वर्षा एखंडे, मराठी इंडियन आयडॉल फेम गायक प्रतीक सोलसे व बॉलिवूड गायक राज नारायण यांनी गाणी सादर केली.
गायक प्रतीक सोलसे यांनी ‘खेळ मांडला’ या गीताने सुरुवात करून मैफलीला भक्तीमय रंग दिला. त्यानंतर वर्षा एखंडे यांनी भक्तिगीत सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढविली. पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांच्या पत्नी महिमा कुलकर्णी यांनीही गायनाची हौस पूर्ण करीत एक गीत सादर केले.
चंकी पांडे यांनी त्यांच्या गाजलेल्या गाण्यांवर नृत्य सादर केले. यावेळी पोलिस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्यासह इतर अधिकारी व अंमलदारांनीही नृत्य करीत कार्यक्रमाचा आनंद घेतला. कार्यक्रमाचे निवेदन अश्विनी गोस्वामी यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT