उंड्री - ‘ब्रिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’च्या पदवीदान समारंभाप्रसंगी उपस्थित असलेले ‘आर्किटेक्‍चर आणि इंटेरियर डिझाइन’चे विद्यार्थी.
उंड्री - ‘ब्रिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’च्या पदवीदान समारंभाप्रसंगी उपस्थित असलेले ‘आर्किटेक्‍चर आणि इंटेरियर डिझाइन’चे विद्यार्थी. 
पुणे

नियोजनाअभावी शहरे बकाल - देवेंद्र फडणवीस

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘‘आपले नगर नियोजनाकडे दुर्लक्ष झाल्याने शहरे बकाल झाली आहेत. त्यांची वाढ आडवी-तिडवी होत आहे. त्यामुळे भविष्यात शहरांचा विकास पर्यावरण पूरक आणि शाश्‍वत व्हायला हवा,’’ अशी कबुली मुख्यमंत्री व नगरविकासमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली.

ते म्हणाले, ‘‘नगर रचनाकार हा केवळ एक इमारत बांधत नाही किंवा शहर उभे करीत नाही, तर तो राष्ट्र उभे करतो. जागतिक तापमानवाढीचा धोका मोठा आहे. जगाचे तापमान दोन डिग्रीने वाढले, तर त्याचे अनेक दुष्परिणाम पुढच्या पिढीला सोसावे लागतील.’’ तंत्रज्ञान क्षेत्रात रोज क्रांती होत आहे. बदलणारे तंत्रज्ञान आणि ते आत्मसात करणे हे फार मोठे आव्हान आहे. यापुढील काळात पैसा नाही तर माहिती हाच पैसा ठरणार आहे. देशाचा आर्थिक विकासाचा दर वाढत असून यातून निर्माण होणाऱ्या रोजगाराच्या संधीचा आपण लाभ घेतला पाहिजे.’’

सतीश मिसाळ एज्युकेशन फाउंडेशनच्या ‘ब्रिक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’च्या पहिल्या पदवी प्रदान समारंभात ते बोलत होते. महापौर मुक्ता टिळक, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, संचालिका आमदार माधुरी मिसाळ, दीपक मिसाळ, पूजा मिसाळ आदी उपस्थित होते. वास्तुशास्त्र शाखेतील सर्वोत्कृष्ट ठरलेला इशान केसकर, चैत्राली देशपांडे, जगदीश सुतार, अद्वैत जाधव, श्रद्धा धुपाटणे, संजना जदोन, हर्शल मुथा, सिमरन शहा, पीयूष गोठी आदींना गौरविण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT