Citizen Oppose migration of Wine Shop on Highway Wagholi 
पुणे

वाघोलीमध्ये महामार्गालगत होणाऱ्या वाईन शॉप स्थलांतराला विरोध

सकाळवृत्तसेवा

वाघोली : सध्या आतल्या रोडवर असलेले वाईन शॉप पुन्हा पुणे नगर महामार्गालगत स्थलांतरित होण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्थलांतराच्या हालचाली लक्षात येताच नागरिकांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे. माहिती सेवा समितीने याबाबत शासन स्थरावर स्थलांतराला विरोध दर्शविणारे पत्र दिले आहे. ही वाईन शॉप महामार्गालगत असताना झालेला त्रास नागरिक अद्याप विसरलेले नाही.

पूर्वी महामार्गालगत असणारी दोन वाईन शॉप आव्हाळवाडी रोड वर स्थलांतरित झाले. ही या रोड लगतच असल्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना विशेषतः महिलना खूप त्रास सहन करावा लागत आहे. पूर्वी ही वाईन शॉप पुणे महामार्गालगत असताना वाहतूक कोंडी बरोबर दारुड्यांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. मुळात कोणत्याही रस्त्यालगत वाईन शॉप असणेच नागरिकांसाठी खूप त्रासदायक आहे. येथे दारू घेण्यासाठी येणारी मंडळी कशीही वाहने पार्क करतात. भर रस्त्यात त्यांचा गोंधळ सुरू असतो. दुकानासमोरच त्यांचा पिण्याचा धिंगाणा सुरू असतो. लाजिरवाणी कृत्य ते अनेक वेळा करतात. महिलांना अशा परिसरातून जाणेच शक्य होत नाही. जागा भाड्याने देणारे जागा मालक फक्त कमाईचा विचार करतात. सध्या पुणे-नगर महामार्गावर वाहतूकीचे प्रचंड प्रमाण आहे. ही वाहतूक नियंत्रित करताना पोलिसांच्या नाकी नऊ येते. अशा परिस्तितीत ही वाईन शॉप महामार्गालगत स्थलांतरित झाल्यास वाईट परिस्थिती निर्माण होईल. त्यांना स्थलांतरित होऊ देऊ नये अशी मागणी सध्या जोर धरू लागली आहे. स्थलांतर करण्याचा प्रयत्न केल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

''पूर्वीच्या वाईन शॉपची जागा गावठाणात नाही, बिगरशेती नाही, गावठाणात असल्याचा खोटा दाखला देणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई झाली असुन रोडपासुन १० फुटावर असल्याने ते कायद्यात बसत नाही. त्यामुळे दारु दुकानास स्थलांतराची परवानगी देऊ नये यांचे परवाने कायमचे रद्द करावेत.''
- चंद्रकांत वारघडे, अध्यक्ष, माहिती सेवा समिती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT