पुणे

एकलहरे, मंचर गावांच्या सरहद्दीवरील पूलांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन

डी. के. वळसे पाटील

मंचर : खेड ते सिन्नर मंचर बाह्यवळण चौपदरीकण रस्त्यावर एकलहरे व मंचर (ता. आंबेगाव) या दोन गावांच्या सरहद्दीवर भूमिगत पूल व्हावा. या मागणीसाठी परिसरातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी (ता. २६) बाह्यवळण रस्त्याचे काम बंद करून आंदोलन केले. येत्या १५ दिवसांत प्रश्न मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते राजेंद्र थोरात व शिवसेनेचे नेते संतोष डोके यांनी दिला. 

पुणे-नाशिक रस्ता ते दाधारा देवी (मंचर) हा ५० वर्षापूर्वीचा जुना रस्ता आहे. या रस्त्यावरून होणारी वाहतूक बाह्यवळण रस्त्यामुळे बंद पडली आहे. शेतकरी, कामगार, प्राथमिक शाळेतील मुले व महाविद्यालयातील विद्यार्थी यांची गैरसोय होत आहे. दाधरा देवीच्या  दर्शनासाठी दररोज शेकडो भाविक ये-जा करतात. तसेच शेती माल व दुध ने-आण करण्यासाठी या रस्त्याचा वापर केला जातो. येथे बाह्यवळण झाल्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल सुरु झाले आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कंत्राटदाराची वाहने अडवून आंदोलन केले.

यावेळी मंचरचे उपसरपंच युवराज बाणखेले, बाळासाहेब खानदेशे, अरुण लोंढे, सतीश थोरात, बाळासाहेब बाणखेले, अमर थोरात, संगीता बाणखेले, पांडुरंग बाणखेले आदी शेतकरी आंदोलनात सहभागी झाले होते.

मंचर पोलीस ठाण्याचे नाईक गणपत डावखर, विनोद गायकवाड यांनी आंदोलकांबरोबर चर्चा केल्यानंतर आंदोलन तूर्त स्थगीत केल्याचे राजेंद्र थोरात यांनी सांगितले.

खेड ते सिन्नर बाह्यवळण चौपदरीकरण रस्त्यामुळे किमान ८० वेग मर्यादेने वाहने ये-जा करणार आहेत. त्याचा फटका मंचर व एकलहरे येथील १०० कुटुंबाना बसणार आहे. रस्ता ओलांडता येणार नाही. अपघातांचे प्रमाण वाढेल. ग्रामस्थ, विद्यार्थी व भाविकांच्या सुरक्षतेसाठी मंचर व एकलहरे या दोन गावांच्या शिवेवर भूमिगत पूल होणे गरजेचे आहे. राज्याचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनाही शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ भेटणार आहे. -राजेंद्र थोरात, राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Sangli Crisis : सांगलीच्या राजकारणात खळबळ! 'राष्ट्रवादी'च्या 35 जणांचे राजीनामे; मैनुद्दीन बागवान यांच्याविरोधात बंड, स्वीकृत निवडीचा वाद

Pune Crime: उरुळीकांचनमध्ये गंभीर घटना; अल्पवयीन मुलावर जबरदस्तीचा प्रयत्न, POCSO कायद्यान्वये कारवाई!

Latest Marathi News Live Update : राळेगाव शहरात हिंदुत्ववादी संघटने कडून जोरदार घोषणाबाजी

Mobile Booster Tips : तुमचा मोबाईल सतत हँग होतोय? स्लो फोनला ५ मिनिटांत बनवा सुपरफास्ट, एकदा वापरून पाहा 'ही' सोपी ट्रिक

Nagpur News: उन्हाळ्यात ताडगोळे आरोग्यासाठी लाभदायक; शरीरातील उष्णतामान कमी करण्यासाठी होते मदत

SCROLL FOR NEXT