पुणे

बारामती परिसरातील उंडवडीत चोरांचा डाव फसला अन्...

विजय मोरे

उंडवडी : उंडवडी कडेपठार ( ता. बारामती) येथे (सोमवारी) रात्री चोरट्यांनी पुन्हा धुमाकूळ घालून गावकऱ्यांची झोप उडवली. गस्तीवरील युवकांनी एकाला शिताफीने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. येथे चार दिवसापूर्वीचं चोरट्यांच्या हल्यात एका ज्येष्ठाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा चोरट्यांचा चोरीचा डाव ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे उधळला. 

उंडवडी कडेपठार येथे चार दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी जराडवस्तीवर हल्ला केला होता. यामध्ये ज्येष्ठ नागरीक निवृत्ती विष्णू जराड यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात चोरट्यांची भिती पसरली आहे. त्यानंतर गावकरी जागृत राहून रात्रीचे गस्त घालत आहेत. 

सोमवारी रात्री (ता. 15) साडे दहा वाजण्याच्या दरम्यान काही युवक दादासाहेब जराड यांच्या वस्तीनजिक गस्तीवर असताना त्यांना बारामती-उंडवडी रस्त्याच्या बाजूला एक मारुती कंपनीची चारचाकी अल्टो कार (नंबर प्लेट नसलेली) व एक हिरो होंडा कंपनीची फॅशन दुचाकी (नंबर प्लेट नसलेली) रस्त्याला लावल्याचे संशयास्पद आढळून आली. 

त्यामुळे युवकांनी आजूबाजूला पाहणी केल्यानंतर पाच ते सहा चोरटे पोकलेश मशिनचे ब्रेकर बांधत असल्याचे दिसले. युवकांनी घटनेचे गांभीर्य ओळखून चोरांना  पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पाच चोरटे  चारचाकी कारमध्ये बसून पळून गेले. तर एक चोर दुचाकीसह गस्त पथकातील युवकांच्या हाती लागला. या चोराला गावकऱ्यांनी चोप देवून तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या घटनेनंतर गावकऱ्यांना 'जागते रहो' चा कडक पहारा देवून रात्र जागून काढावी लागली. येथे चार दिवसांपूर्वी झालेल्या चोरीचा तपासासह रात्री एकाला रंगेहाथ पकडलेल्या चोराकडून गुन्हाची माहितीची उकल करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. 

(संपादन : सागर डी. शेलार)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT