DAUND  
पुणे

दौंडकरांनी नक्की जगायचं कसं...कोरोनाच्या सोबतीला या समस्यांचाही त्रास 

प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) : दौंड शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना कोरोनासह कचरा कोंडी, दुर्गंधी, रस्त्यांवरील चिखल आणि तुंबलेली गटारे या समस्याही वाढल्याने विषाणूजन्य ताप असलेल्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. शहरात ६१ दिवसांत ११० जणांना कोरोनाची बाधा झाली असून, त्यापैकी८७ जण बरे झाले आहेत.

दौंड उप जिल्हा रूग्णालयाकडून १४ जणांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी १ जुलै रोजी चंद्रभागानगर येथील एका ४४ वर्षीय महिला आणि जनता कॅालनी येथील ४९ वर्षीय पुरुष, अशा दोन जणांना बाधा झाली आहे. शहरातील बाधितांची संख्या १७ असून, त्यामध्ये राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) गट क्रमांक सातचे ३ पोलिस , गट क्रमांक पाचचे २ पोलिस आणि १२ नागरिकांचा समावेश आहे. एसआरपीएफच्या बाधित पोलिसांवर पुणे येथे उपचार सुरू आहेत, तर अन्य नागरिकांवर दौंड शहरातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती उप जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॅा. संग्राम डांगे यांनी दिली. 

शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दौंड नगरपालिकेकडून सलग चार दिवस कचरा संकलित केला नाही. त्यामुळे शहरात दुर्गंधी सुटली आहे. प्रतिबंधित क्षेत्रात देखील कचरा रस्त्यांवर विखुरलेला आहे. दररोज १० टन ओला व ८ टन सुका कचरा संकलित केला जातो. सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण व दौंड नगरपालिकेचा हलगर्जीपणा आणि अपूर्ण कामांमुळे शहर व परिसरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. शहरातील रुग्ण विषाणूजन्य आजारांमुळे कंबरदुखी, घाम सुटणे, डोकेदुखी, खोकला, ताप आणि थकव्याने त्रस्त झाले आहेत. 

आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू 
दौंड शहरात १ मे ते १ जुलै या कालावधीत ११० जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी एसआरपीएफ गट क्रमांक सातचे ४३, गट क्रमांक पाचचे ३ पोलिस , इंडियन रिझर्व्ह बटालियनचे (आयआरबी) १५ पोलिस आणि शहरातील २६  नागरिक, असे एकूण ८७ जण बरे झाले आहेत. शहरात तीन महिलांसह एकूण ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT