Chandni Chowk Flyover esakal
पुणे

पुण्यातील 'या' चौकातून प्रवास करताना नागरिकांना जीव घालावा लागतोय धोक्यात; रस्ता ओलांडताना अपघाताचीही शक्यता!

चांदणी चौकातून मुंबई-बंगळुर राष्ट्रीय महामार्ग (Mumbai-Bangalore National Highway) जात असल्याने या मार्गवर वाहनांना प्रचंड वेग असतो.

समाधान काटे

या चौकातून सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबईला नियमित जाणारे-येणारे असे हजारो प्रवासी आहेत.

मयूर काॅलनी : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (National Highway Authority) कोट्यवधी रुपये खर्च करून चांदणी चौकात उड्डाणपूल (Chandni Chowk Flyover) बांधला. या उड्डाणपुलाचे उद्घाटनही मोठ्या थाटामाटात करण्यात आले. उड्डाण पुलाची कित्येत कामे अपूर्ण असताना उद्घाटन घाईघाईने केल्याचा आरोप त्यावेळी झाला होता. तो आरोप खरा ठरावा अशीच परिस्थिती सध्या चांदणी चौकात दिसून येते. या ठिकाणी उतरणाऱ्या प्रवाशांना रस्ता ओलांडण्याठी पादचारी मार्गच केला नसल्याने दररोज हजारो प्रवाशांना स्वत:चा जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे.

चांदणी चौकातून मुंबई-बंगळुर राष्ट्रीय महामार्ग (Mumbai-Bangalore National Highway) जात असल्याने या मार्गवर वाहनांना प्रचंड वेग असतो. अवजड वाहने देखील याच मार्गावर धावतात. या चौकातून सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबईला नियमित जाणारे-येणारे असे हजारो प्रवासी आहेत. मुंबईच्या दिशेने आलेले प्रवासी कोथरूडच्या बाजूला उतरल्यावर त्यांना एनडीए, भूगाव, मुळशीकडे जाण्यासाठी किंवा एनडीएकडून कोथरूड, बावधनकडे पायी जाण्यासाठी पादचारी मार्ग नसल्याने अनेक प्रवासी स्वत:चा जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडतात.

उड्डाणपुलाचे उद्घाटन होऊन दहा महिने उलटले आहेत. मात्र, अद्यापही पादचाऱ्यांच्या दृष्टीने व्यवस्था केलेली नाही. चौकतील रस्ता ओलांडण्यासाठी विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, नोकरदार, अपंग नागरिकांसाठी कोणतीही सोय न केल्याने प्रवाशांनी प्रशासनाच्या विरोधात 'सकाळ'च्या प्रतिनिधीकडे संताप व्यक्त केला. तसेच नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन चौकात पादचारी मार्ग तात्काळ उभा करावा, अशी मागणी देखील पादचाऱ्यांनी केली आहे.

Chandni Chowk Flyover

“रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी मार्ग नसल्याने दुभाजकावरून जावे लागते. भरधाव वाहनांच्या गर्दीतून स्वत:चा जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. ज्या महिलांकडे लहान मुलं असतात, त्यांचे खूप हाल होतात. ज्येष्ठ नागरिकांना रिक्षा भाड्याने केल्याशिवाय पर्याय राहत नाही. या ठिकाणी पादचारी मार्ग करायला हवा.”

- सुप्रिया जाधव, प्रवासी

"पादचाऱ्यांच्या सोईसाठी पादचारी मार्ग (फूट ओव्हर ब्रिज) राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून बांधला जाणार आहे. काल झालेल्या बैठकीत मी सांगितले आहे. तसेच पत्र देखील देणार आहे."

-मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री, नागरी विमान वाहतूक व सहकार

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांना मंगळवार (ता. ९) फोनवर आठ ते दहा वेळा संपर्क केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट सुरू

महामार्ग ओलांडून विरूध्द दिशेला जायचे असेल तर रिक्षा करून दोन ते तीन किलोमीटरचा वळसा घालून जावे लागते. मध्यरात्री चौकात आल्यावर विरूध्द दिशेला जायचे असेल, तर रिक्षा देखील उपलब्ध नसतात. त्यामुळे पादचाऱ्यांना तीन किलोमीटर चालत जावे लागते. तीन किलोमीटर जाण्यासाठी रिक्षाचालक तब्बल १२० रूपये मागतात. रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट सुरू आहे. मंगळवार (ता.९) ‘सकाळ’च्या प्रतिनिधीने पाहणी केली असता, महामार्गाच्या दुभाजकावर लोखंडी जाळी बसवण्याचे काम सुरू होते. रस्ता ओलांडण्यासाठी जाळीच्या बाजूने प्रवासी चालत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : सीमाप्रश्‍नी तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी धैर्यशील माने यांची नियुक्ती, महाराष्ट्र सरकारकडून प्रसिद्धीपत्रक जारी

SCROLL FOR NEXT