Citizens have welcomed the new bus at Ranjangaon Ganpati.jpg 
पुणे

रांजणगाव गणपती येथे नवीन बसचे स्वागत

नागनाथ शिंगाडे

तळेगाव ढमढेरे (पुणे) : श्री क्षेत्र रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे आजपासून सुरु झालेल्या पीएमपीएमएलच्या नवीन बसचे स्वागत ग्रामंस्थांनी केले. वाघोली ते रांजणगाव गणपती या मार्गावर पुणे महानगर परिवहन महामंडळाने बस सेवा सुरु केली असून, आज रांजणगाव ग्रामस्थांनी बस चालक व वाहक आणि प्रवाश्यांचा सत्कार केला. ३० मिनिटाला वाघोली ते रांजणगाव गणपती अशी बस सेवा सुरू झाली असून, दिवसातून १० फेऱ्या होणार आहेत. 

यावेळी सरपंच सर्जेराव खेडकर, पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून बसचे स्वागत करण्यात आले. बस सेवा सुरू झाल्यामुळे कामगार, विद्यार्थी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. अनेक वर्षांची बस सुरु करण्याची मागणी पूर्ण केल्याने आनंद व्यक्त करण्यात आला. श्री क्षेत्र रांजणगाव गणपती हे अष्टविनायक महागणपतीचे तीर्थक्षेत्र व पंचतारांकीत औद्योगिक वसाहत असल्याने नागरिक व कामगारांना ही बससेवा सोयीची झाली आहे.

यावेळी उद्योजक राजेश लांडे, युवासेना जिल्हा प्रमुख बापूसाहेब शिंदे, रामदास लांडे, नामदेव पाचुंदकर व ग्रामस्थ उपस्थित होते
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India ODI Squad: भारताचा वनडे संघ जाहीर! इंग्लंड दौऱ्यातून शतक करणाऱ्या जैस्वालला डच्चू, तर विराट कोहलीबाबत काय झाला निर्णय?

Badlapur: मध्यरात्री २ वाजता २५०च्या वेगात BMWचा अपघात, दोघांचा मृत्यू; अवयव रस्त्यावर अर्धा किमीपर्यंत विखुरले, गाडीच्या इंजिनचे तुकडे

Central Railway: कर्मचाऱ्यांचे हाल होणार! मध्य रेल्वेवर 2 दिवस विशेष ब्लॉक, काही लोकल रद्द; वेळापत्रकातही बदल, वाचा सविस्तर

पुण्यात गोळीबाराचा थरार! गुन्हेगाराला पकडायला गेल्यावर अचानक गोळीबार, पोलिसांनीही दिलं प्रत्युत्तर, काय घडलं?

Operation Tiger: महाराष्ट्रात पालटू शकतो गेम? आमदार फोडले पण उद्धव ठाकरेंचे खासदार फोडणे शिंदेंसाठी सोपे नाही; Inside Story काय?

SCROLL FOR NEXT