balewadi.jpeg 
पुणे

प्रथमेश पार्क परिसरातील  नागरिकांचे जनजीवन विस्कळित 

सकाळ वृत्तसेवा


पुणे ः बाणेर येथील प्रथमेश पार्क येथे मुळा नदीच्या पुरामुळे तसेच जवळील ओढ्याचे पाणी या ठिकाणी शिरल्याने परिसरातील नागरिकांवर मोठे संकट कोसळले आहे. नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले असून, अनेक समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत आहे. 

रविवार सकाळपासून या ठिकाणी पाणी शिरायला सुरवात झाली. या पातळीत सतत वाढच होत असल्याने संपूर्ण सोसायटीला जलाशयाचे रूप प्राप्त झाले आहे. आज पाणी जास्तच प्रमाणात आल्याने सोसायटीच्या प्रवेशद्वाराला पाणी लागले आहे. सध्या या ठिकाणी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, पोलिस, आपत्कालीन जीवरक्षक पथक परिसरात मदत कार्य करीत आहेत. सकाळपासून चाळीस कुटुंबांना सुरक्षितरीत्या बाहेर काढले असून अजूनही हे काम सुरूच आहे. काही नागरिक कितीही विनवण्या केल्या तरी घर सोडून दुसरीकडे राहायला जायला तयार नाहीत. या ठिकाणी बोटीमधून नागरिकांना बाहेर काढले जात आहे. 


आपत्कालीन जीवरक्षक पथक योग्य वेळी आमच्या मदतीला धावून आल्याने आम्ही सुखरूप बाहेर पडू शकलो. आम्ही प्रशासनाचे आभार मानत असल्याचे प्रथमेश पार्कचे रहिवासी संजय ताम्हाणे यांनी सांगितले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Praful Hinge? वैभव-यशस्वीला रोखण्यासाठी SRH ने विदर्भच्या पोट्ट्याला पदार्पणाची दिली संधी; जाणून घ्या त्याची प्रेरणादायी कहाणी

Success Story: शेतकरी कुटुंबातील मुलाची 'एनडीएत' भरारी; अमेय साळुंखेंचा देशात 34 वा क्रमांक, आई-वडिलांनी कष्टाने वाढवलं..

India Monsoon Update 2026 : यंदा ‘एल निनो’ मुळे पावसात घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा मान्सूनबाबत चिंताजनक अंदाज

Sangamner Concert: संगमनेरकरांची अजरामर आठवण; बाळासाहेब थोरात-आशा भोसले यांचे जिव्हाळ्याचे नाते, कॉन्सर्टमुळे मनात कायम घर!

Big Breaking : IPL 2026 च्या वेळापत्रकात बदल, चेन्नई सुपर किंग्स अन् गुजरात टायटन्सच्या चाहत्यांसाठी महत्त्वाची बातमी... कारण काय?

SCROLL FOR NEXT