पुणे

पुण्यातील 'या' गावात रस्त्यावर रांगोळी काढून पुरणपोळीचा नैवेद्य; काय आहे प्रकरण? 

नवनाथ भेके

निरगुडसर : आज भाद्रपदी बैलपोळा घरोघरी रांगोळी काढून बैलांना सजवून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो, परंतू आंबेगाव तालुक्यातील ग्राहक पंचायतीच्या नागरिकांनी एक आगळेवेगळे आंदोलन करत सण साजरा करत मंचर-रांजणी रस्त्यावरील खड्यांना सर्वपित्री अमावस्याच्या मुहूर्तावर रांगोळी काढून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून निषेध व्यक्त करण्यात आला.

आंबेगाव तालुका ग्राहक पंचायतीच्या कार्यकर्त्यांनी मंचर एस कॉर्नर, चांडोली खुर्द, चांडोली बू, खडकी फाटा, थोरांदळे, रांजणी आदी ठिकाणी निषेध केल्याची माहीती पुणे जिल्हा ग्राहक पंचायतीचे नितीन मिंडे यांनी दिली.

दरम्यान, या वेळी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर उंडे, संघटक सुभाष मावकर, गणेश थोरात, कैलास मावकर, प्रमिला टेमगिरे, मंगेश टेमगिरे, दत्ता विश्वासराव, दगडू लोखंडे, संदिप वाबळे, अशोक भोर, नितीन मिंडे उपस्थित होते.

या मार्गावरील प्रत्येक गावातून उस्फूर्तपणे कोरोनाचे सर्व नियम पाळून सुमारे 50 ते 60 कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. तरी प्रशासनाने या मार्गावरील खड्डे त्वरित बुजवावेत असे आवाहन पुणे जिल्हा ग्राहक पंचयतीचे नितीन मिंडे यांनी केले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Air Pollution : दिल्लीत विषारी हवेचा कहर, प्रजासत्ताक दिनाआधी 'गॅस चेंबर' बनली राजधानी AQI 375 वर पोहोचला

Maharashtra Biodiversity : महाराष्ट्राच्या जैवविविधतेत भर; दख्खन पठारावर प्रथमच दुर्मीळ पतंगांची नोंद, विदर्भातील संशोधकांच्या प्रयत्नांना यश

हवाला मार्गे कोलकाताहून I-PAC च्या गोवा कार्यालयात पोहोचले 20 कोटी, ईडीचा खळबळजनक दावा!

Maharashtra Cold Wave : राज्यात तापमानाचा पारा घसरला; गारठा कायम राहणार ? जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान...

NHM Gadchiroli Bharti 2026: राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोलीत 172 पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या A टू Z संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT