Citizens protested due to lack of facilities in Dhayari crematorium Marathi News  
पुणे

धायरी स्मशानातील सुविधांची वानवा; स्वछतागृहातील पाणी वापरून सावडण्याचा विधी पूर्ण करावा लागल्याने नागरिक संतप्त

सोमवारी गावातील सावडण्याचे, अस्थी जमा करण्याचे २ विधी होते. साधारण ४००-५०० नागरिक जमा झाले होते.

विठ्ठल तांबे

धायरी : धायरी गावातील स्मशानभूमीमधे स्वच्छता, पाणीपुरवठा अशा मुलभूत सुविधांची वानवा असल्याने महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी बंधुत्व ग्रुप, मिलिंद पोकळे व त्यांचे सर्व सहकारी यांनी स्मशानभूमीत लाक्षणिक उपोषण केले.

सोमवारी गावातील सावडण्याचे, अस्थी जमा करण्याचे २ विधी होते. साधारण ४००-५०० नागरिक जमा झाले होते. मात्र नळाला पाणी नसल्याने नागरिकांची गैरसोय झाली.‌ स्वच्छताग्रुहातून पाणी घेऊन वापर करण्याची वेळ आली.

मिलिंद पोकळे यांनी वाॅर्ड ऑफीसचे संदीप खलाटे यांच्याशी संपर्क साधून प्रश्न सांगितला. त्यानंतर तेथे एक कर्मचारी पोहचला. पोकळे यांनी सांगितले की महानगरपालिकेच्या मदमस्त अधिकाऱ्यांना गैरसोयींची थोडी सुध्दा जाणीव नाही. अशा अधिकाऱ्यांचा व महानगरपालिकेचा जाहीर  निषेध आम्ही करतो. जो पर्यंत या अधिकाऱ्यांना जाग येत नाही तो पर्यंत आंदोलन केले जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hinjewadi IT Park : हिंजवडी आयटी पार्कमध्ये १०० हून अधिक एनएसजी कमांडोंचा ताफा; बुधवारी रात्री पुण्यातील आयटी पार्कमध्ये थरार

WTC Points Table Update : पाकिस्तानच्या विजयानंतर गुणतालिकेत उलथापालथ; भारताचे फायनलमध्ये पोहोचण्याचे समीकरण बिघडले?

लोकसभेत मोठा ट्विस्ट! विरोधकांच्या २२ खासदारांमुळे गणित बदलणार! दोन-तृतीयांश बहुमत मिळवण्यापासून NDA किती दूर?

Marathi News Live Updates : पळसदरीजवळ कार-दुचाकीची भीषण धडक; महिलेचा जागीच मृत्यू

Para Athletics: राष्ट्रकुलमध्ये सुवर्णपदक पटकावलेल्या मराठमोळ्या दिलीप गावितचा निर्धार; पॅरा आशियाई स्पर्धेत जागतिक विक्रमाचे लक्ष्य

SCROLL FOR NEXT