ma.jpg
ma.jpg 
पुणे

पुण्यातील 'त्या' प्राण्यांना पकडण्यासाठी कर्नाटकातील ठेकेदार, पण... 

संदीप जगदाळे

हडपसर : महापालिका प्रशासनाकडून मोकाट डुकरे पकडण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. मात्र, तरीही डुकरांची संख्या अटोक्यात राहिलेली नाही. डुकरांमुळे त्रास सहन करावा लागत असल्याच्या असंख्य तक्रारी रहिवाशांनी महापालिकेकडे नोंदविल्या आहेत.

दरम्यान, मोकाट डुकरे पकडण्यासाठीची महापालिकेची यंत्रणा कुचकामी ठरल्याने हतबल झालेल्या महापालिका प्रशासनाने डुकरांना पडकडण्यासाठी कर्नाटकातील ठेकेदाराची नेमणूक केली, या ठेकेदाराला जास्तीची रक्कमही देऊ केली. इतके करुनही मोकाट डुकरांची संख्या कमी झाली नाही, त्यामुळे ‘येरे माझ्या मागल्या’सारखी स्थिती आहे.

वानवडी व हडपसर प्रभाग समितीमध्ये मोकाट डुकरांवर कारवाई करावी याविषयावर अनेकदा चर्चा झाली. नगरसेवकांनी सहाय्यक आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढला, उपोषण केले. मात्र प्रश्न जेसे थे असून त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. परिसरात सुमारे ३२ वराह पालन करणारे व्यवसायीक आहेत. तीन हजाराहून अधिक मोकाट डुकरांच्या उपद्रवामुळे नागरिक हैराण आहेत.

पालिका आयुक्तांनी डुक्कर मालकांवर गुन्हे दाखल करण्याची सूचना पोलिसांना केली आहे. मात्र अदयाप एकही गुन्हा दाखल झालेला नाही. बंदिस्त वराह पालनासाठी वराह पालन सहाकारी संस्था स्थापन करून कॅटल शेडसाठी जागा उपल्बध करून देण्यासाठी आयोजीत केलेल्या बैठकीत या व्यवसायिकांनी विरोध केला. त्यामुळे हि योजना बारगळली. डूक्कर पालनाच्या या बिनभांडवली व्यवसायातून लाखो रूपयांची उलाढाल होत आहे. त्यातून मिळणाऱया पैशावर मुजोर बनलेले डुक्कर मालक शिरजोर बनू लागले असून महापालिका मात्र कारवाईचे इशारे आणि धमक्याच देत आहे.

मोकाट डुकरांचा बंदोबस्त करावा यासाठी माजी आमदार महादेव बाबर, माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी सहाय्यक आयुक्तांना डुक्कर भेट दिले, क्षेत्रीय कार्यालयात टाळेबंद आंदोलन केले, नगरसेवक चेतन तुपे यांनी अनेकदा मोकाट डुकरांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली, मनसेच्या अजय नाव्हलेंनी आंदोलन केले. गेली अनेक वर्षे या प्रश्नावर आवाज उठविला जात आहे. मात्र मोकाट डुकरांनी परिसरात हैदोस मांडला आहे.

नागरिक संजय सातव म्हणाले, ''मोकाट डुकरे पकडण्याची संख्या व डुकरांची उत्पत्ती याचे प्रमाण व्यस्त आहे. या मोहिमेसाठी कुशल कर्मचा-यांचा तुटवडा व अपुरा कर्मचारी वर्ग आरोग्य विभागाकडे आहे. यापूर्वी शहरात डुकर कारवाई करणा-या कारवाई करण्यास गेलेल्या कर्मचा-यांवर प्राणघातक हल्ले झाले आहेत. त्यामुळे कर्मचारी देखील कारवाई करण्यास धजावत नाही. त्यामुळे खासगी संस्थेला मोकाट डुकरे पकडण्याचे काम दिले, मात्र हा प्रश्न सुटला नाही.'' 

नागरिक बापुसाहेब बढे म्हणाले, या व्यवसायावर काही कुटुंबांचा चरितार्थ चालत आहे; पण त्याचा उपद्रव मात्र संपूर्ण हडपसरला होत आहे. नागरिकांना डुक्कर चावण्याच्या घटना अधुनमधून घडत असतात. परंतू अशा घटनांकडे महापालिका गांभीर्याने पाहण्यास तयार नाही. मानवी वसत्यांमध्ये मोकाट डुकर पालन हा अनअधिकृत व्यवसाय आहे. मृत डुकरांना वेळेत उचलून नेले जात नाही. त्यामुळे दुर्गंधी पसरते. डूकरांचे कळप ड्रेनेज, घरांचे कंपाउड उकरतात. त्यामुळे पालिकेने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

वानवडीचे साहय्यक महापालिका आयुक्त युनूस पठाण म्हणाले, ''मोकाट डुकरांवर कारवाई करण्याची जबाबदारी आरोग्य विभागाची आहे. या विभागाशी तातडीने संपर्क साधून मोकाट डूकरांवर कारवाई केली जाईल.''

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Update: कर्नाटकात 28 जागांपैकी आम्ही 25 जागा जिंकणार- बीएस येडियुरप्पा

अनेक राज्यांना मिळणार कडक उन्हापासून दिलासा, मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाची माहिती

Ramdas Athavale : आरक्षणाबाबत राहुल गांधींच्या आरोपांची निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार; रामदास आठवले

Bernard Hill : 'टायटॅनिक'चा कॅप्टन ते 'लॉर्ड ऑफ रिंग्स'मधील राजा; बर्नार्ड यांनी 'या' भूमिका अजरामर केल्या

Instagram Influencer: इन्स्टाग्रामवर केली एक चूक अन् काही क्षणातच गमवावा लागला जीव! तुम्हीही करताय का ही चूक?

SCROLL FOR NEXT