pmc sakal
पुणे

शहरी गरीबच्या लाभापासून नागरिकांना रोखू नये

१४० रुग्णालयात सुरू राहणार स्थायी समितीची सूचना

सकाळ वृत्तसेवा

पुणे : महापालिकेतर्फे एक लाखाहून कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या नागरिकांसाठी ‘शहरी-गरीब योजना’ राबविली जाते. यामध्ये आता पुन्हा एकदा १४० रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच मिळकतींची माहिती काढून जास्त उत्पन्न असल्याचा ठपका ठेवून कोणालाही या योजनेपासून रोखता येणार नाही अशी सूचना स्थायी समितीने प्रशासनाला केली आहे. स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले. (PMC News)

महापालिका प्रशासनाने शहरी गरीब योजनेसाठी १४० रुग्णालयाशी महापालिकेने करार केले होते. पण राज्य शासनाच्या महात्मा फुले आरोग्यदायी योजना व इतर योजना ११ रुग्णालयांमध्ये असल्याने या रुग्णालयातील शहरी गरीब योजना महापालिकेने बंद केली. त्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. खासगी रुग्‌णालयात छोट्या-मोठ्या आजारांसाठी, शस्त्रक्रियेसाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना आर्थिक सवलत मिळते. हृदयरोग, किडनी, कॅन्सर सारख्या मोठ्या आजारातील रुग्णांसाठी ही योजना लाभदायक असे असताना रुग्णालये वगळण्यात आले होते.

आता पुन्हा या रुग्णालयांचा समावेश केला जाणार आहे. गेल्या वर्षी या योजनेचा लाभ घेतलेल्या मिळकतकरधारक किंवा सदनिकाधारक लाभार्थ्यांच्या चौकशी करून त्यांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. लाभार्थी मिळकतकरधारक किंवा सदनिकाधारक नसावा अशी कुठलीच अट या नियमावलीत नसल्याने उत्पन्न एक लाखांपेक्षा अधिक असेलच असे ही नाही. त्यामुळे मिळकतकरधारक आहे म्हणून या लाभार्थ्यांना योजनेतून वगळता येणार नाही अशा सूचना प्रशासनाला केल्या आहेत, असे रासने यांनी सांगितले.

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महापालिकेतर्फे १५ ऑगस्ट २०२२ पर्यंत विविध उपक्रम राबविण्यास स्थायी समितीने मान्यता दिली. हुतात्मा दिन, क्रांतिदिन, प्रजासत्ताकदिन विविध उपक्रमांनी साजरे केले जाणार आहेत. फरासखाना येथील क्रांतिकारक पांडुरंग कर्णिक यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. स्वातंत्र्य सैनिकांच्या निवासस्थानांवर कृतज्ञता फलक लावणे आदी उपक्रम राबविले जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PLAYOFF SCENARIO: सनरायझर्स हैदराबादचा विजय, पण गुजरात टायनट्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचले? 'बाय वन गेट वन' ऑफर

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपले? SRHने विजयासह GT ला अंतिम ४ मध्ये पोहोचवले; १ जागा ३ स्पर्धक...

IPL 2026 Controversy : संजू सॅमसनने विजेच्या वेगाने बेल्स उडवल्या... OUT होताच हेनरिच क्लासन खवळला, अंगावर धावला Video

Gautam Adani: अमेरिकेत गौतम अदानींचा मोठा विजय! US मधील खटला कायमचा बंद; न्याय विभागाने आरोप मागे घेतले

Pune Council Seat Battle: पुणे विधान परिषद जागेसाठी राष्ट्रवादी-भाजपमध्ये रस्सीखेच

SCROLL FOR NEXT