पुणे

भोरमधील पाणीसमस्या कोणामुळे?; नागरिक झाले त्रस्त   

विजय जाधव

भोर ः पाण्याच्या शुध्दीकरणबाबत आणि वितरण प्रक्रीयेत नगरपालिका प्रशानाचे योग्य नियोजन नसल्यामुळे भोरवासीयांनी कित्येक महिन्यांपासून दिवसाआड पाणी मिळत आहे. याशिवाय शहरातील सार्वजनिक आणि खासगी नळ कनेक्शच्या नळाला तोट्या नसल्यामुळे हजारो लीटर पाणी वाया जात आहे.

दरम्यान, नगरपालिकेकडून पाणीपट्टी मोठ्या प्रमाणात घेण्यात येत आहे, मात्र दररोज पाणीपुरवठा केला जात नाही. काही ठिकाणी मुबलक पाणी उपलब्ध आहे तर काही भागात केवळ पंधरा ते वीस मिनिटेच पाणीपुरवठा केला जात आहे. विशेषतः अनाधिकृत झोपडपट्टी आणि विनापरवानगी उभालेल्या टप-या, मोठ्या प्रमाणात असलेली अवैध कच्ची बांधकामे व निवारा शेड अशा परीसरात मुबलक पाणी उपलब्ध असते. 

नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेतील एक जलशुध्दीकरण प्रकल्प बंद पडल्यामुळे संपूर्ण शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे यावर्षी पावसाळ्यात भोरवासीयांना गढूळ पाणी मिळाले नाही. ही चांगली बाब आहे. मात्र आठ महिने झाले तरीही अद्याप जलशुध्दीकरण केंद्राची दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा अद्यापही सुरु आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शहरातील कित्येक नळांना तोट्या नसल्यामुळे पाणी भरुन झाल्यानंतर नळाव्दारे पाणी रस्त्यावर व गटारांमध्ये सोडले जाते. त्यामुळे पावसाळा नसला तरीही शहरात दिवसाआड पाऊल येत असल्याची जाणीव होत आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने पाणीपुरवठ्याकडे  लक्ष घालून त्रुटी दूर कराव्यात अशी मागणी केली जात आहे.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

य़ाबाबत नगरपालिकेचे मुख्याधिकारी विजयकुमार थोरात यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, 
 जलशुध्दीकरणाचे काम पूर्ण झाल्यावर भोरला दररोज शुध्द पाणीपुरवठा सुरु होईल. शहरातील सर्व सार्वजनिक नळांना नगरपालिकेमार्फत तोट्या बसविण्यात येतील. खासगी नळकनेक्शनधारकांनी नळाला तोट्या बसवून घेण्यासाठी सूचना देण्यात येणार आहेत. आणि त्यानंतर मात्र नळाला तोटी न दिसल्यास संबंधीतांचे नळ कनेक्शन बंद करण्यात येणार असल्याचे सांगितले.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा थाट... देवदत्त पडिक्कल, विराट कोहलीची दमदार फटकेबाजी; हैदराबादवर विक्रमी विजय

Akola News : अकोला जिल्ह्यात सिलेंडर टंचाईचा पहिला बळी; रांगेत उभ्या माजी सरपंचाचा मृत्यू

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

SCROLL FOR NEXT