lockdown 
पुणे

या नागरिकांना लागलीये घराची आस, पण प्रशासन देईना साथ... 

धोंडिबा कुंभार

पिरंगुट (पुणे) : मुळशी तालुक्‍यातील 35 हजार परप्रांतीयांना घराची आस लागली आहे. नाव नोंदणी करणे, वैद्यकीय दाखला मिळविणे, सरकारचा परवाना मिळविणे, आदी तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी त्यांची अहोरात्र धडपड चालू आहे. 

मुळशी तालुक्‍याच्या पूर्व भागात औद्योगिक परिसर, इमारती बांधकाम व अन्य छोटे मोठे व्यवसाय यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे परप्रांतीयांचे प्रमाणही बहुतांशी याच भागात आहे. तालुक्‍याच्या पूर्व पट्ट्यातील हिंजवडी, पिरंगुट, कासार आंबोली, भरे, उरवडे, घोटावडे आदी गावांच्या परिसरात या परप्रांतीयांची संख्या जास्त आहे. याशिवाय बावधन, सूस, भूगाव, भुकूम, लवळे, माण, नांदे, म्हाळुंगे तसेच अन्य गावांत इमारती बांधकामे व विविध संस्थांमध्ये मजूर व कामगारांचे प्रमाण सर्वाधिक आहे. पौड येथील तहसील कार्यालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात परप्रांतियांनी गर्दी केलेली आहे. पिरंगुट परिसरात तब्बल साडेचौदा हजार परप्रांतीयांची नोंद झाली असून, त्यात कासारआंबोली, भरे, उरवडे आदी परिसराचा समावेश आहे. त्यातही पिरंगुटमध्ये 8652, कासार आंबोलीत 4274, उरवडेत 1115; तर भरे गावात 371 परप्रांतीय आहेत. 

जोपर्यंत परजिल्ह्यातील परवानगी येत नाही, तोपर्यंत केवळ अर्ज दाखल करून घेतले जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी गर्दी करू नये. ज्यांना एकत्र जायचे आहे, त्यांनीच तलाठी व तहसील कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे. स्वतःच्या वाहनाने जाणाऱ्यांनी सरकारच्या लिंकवर जाऊन परवानगी घ्यायची आहे. त्यामुळे त्यांनी तहसील कार्यालयाशी संपर्क करू नये. पोलिस आयुक्तांच्या कक्षेत येणाऱ्यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात; तर उर्वरित परप्रांतियांनी तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: कोरडिये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे जाले विठोबाचे; संतश्रेष्ठ भानुदास महाराजांनी पांडुरंगास हंपीतून आणले पंढरपूरला

Pune News : माता न तू वैरीनी! ३.५ लाखांसाठी ४० दिवसांच्या चिमुकली विकले...पुण्यातील धक्कादायक प्रकार

Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र आले, पण; कोल्हापुरात शिवसेना -मनसेचे मनोमिलन हेच मोठे आव्हान

Ashadhi Ekadashi 2025 : ऑस्ट्रेलियातील साधकांकडून वारीची साधना, माउलींच्या पालखी सोहळ्यात पूर्ण केली पायी वाटचाल; दोघे करणार परतवारी

Gahininath Maharaj: महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपुरात सरकारने संतपिट स्थापन करावे : गहिनीनाथ महाराज

SCROLL FOR NEXT