पुणे

नागपाकिस्तान, अफगाणिस्तानच्या पासपोर्टसाठी नव्या अटी नागरिकत्व नियम दुरुस्तीनुसार माहिती देणे अनिवार्य

CD

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १ ः केंद्र सरकारने नागरिकत्व नियमांमध्ये महत्त्वाची दुरुस्ती करताना पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश येथून आलेल्या अर्जदारांच्या पासपोर्टसंदर्भात नवी अट लागू केली आहे. या अटीनुसार अर्जदारांना त्यांच्याकडे असलेल्या वैध अथवा मुदत संपलेल्या पासपोर्टबद्दल माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने स्पष्ट केले की, नागरिकत्व अर्ज प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणि नोंदींची अचूकता राखण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे. २००९ मधील मूळ नागरिकत्व नियमांमध्ये यापूर्वी मार्च २०२४ मध्ये शेवटची दुरुस्ती करण्यात आली होती. गृह मंत्रालयाने काल जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे नागरिकत्व (दुरुस्ती) नियम, २०२६ लागू करण्यात आले आहेत. नागरिकत्व अधिनियम १९५५ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून ही दुरुस्ती केली आहे.

नव्या नियमांनुसार
- संबंधित अर्जदाराने त्याच्याकडे पाकिस्तान, अफगाणिस्तान किंवा बांगलादेश सरकारने जारी केलेला वैध अथवा मुदत संपलेला पासपोर्ट आहे किंवा नाही, याची स्पष्ट माहिती अर्जामध्ये द्यावी लागणार
- पासपोर्ट असल्यास त्याचा क्रमांक, जारी करण्याची तारीख, जारी ठिकाण आणि मुदत समाप्तीची तारीख नमूद करणे बंधनकारक
-नागरिकत्व अर्ज मंजूर झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत संबंधित पासपोर्ट टपाल विभागातील वरिष्ठ अधीक्षक किंवा अधीक्षकांकडे जमा करण्यास अर्जदाराने सहमती दर्शविणे आवश्यक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT