(फोटो येणार आहे.)
वाहतुकीस अडथळा ः १८ विक्रेत्यांवर मनपाची कारवाई
अहिल्यानगर, ता. ९ ः शहरातील चितळे रोड आणि आयुर्वेद चौकातील रस्त्यांवर अतिक्रमण करून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या पथारी व्यावसायिकांविरुद्ध महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली. यामध्ये एकूण १८ व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. तसेच अनधिकृतपणे लावण्यात आलेले फ्लेक्स बोर्ड हटविण्यात आले.
महापालिकेला रस्त्याच्या कडेला पथारी मांडून, हातगाड्या लावून वाहतुकीला अडथळा केला जात असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. रस्त्यावर हातगाड्या लावल्यामुळे रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. तसेच पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा उरत नसल्याने अपघाताचा धोकाही वाढला असल्याचे या तक्रारीत म्हटले होते. त्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने शहरातील चितळे रोड
आणि आयुर्वेद चौक परिसरात जाऊन संबंधितांवर कारवाई केली. यावेळी काहींचे साहित्य जप्त केले, तर काहींवर दंडात्मक कारवाई केली. रस्त्यावर बसून व वाहनांना अडथळा निर्माण करून व्यवसाय करणाऱ्या १८ लोकांवर प्रत्यक्ष कारवाई करण्यात आली. चितळे रोड व आयुर्वेद चौक परिसर हे अत्यंत गजबजलेले परिसर आहेत. त्यामुळे येथे रहदारीला व वाहतुकीला अडथळे येतात. रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी होऊन सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे कारवाई करण्यात आल्याचे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.